तुम्ही आजपर्यंत अनेक लहान मुलांना बाटलीतून दूध पिताना पाहिलं असेल, पण कधी हत्तीच्या बाळाला बाटलीने दूध पिताना पाहिलं आहे का? आता तुम्ही विचार करत असाल की जनावराचं पिल्लू बाटलीतून दूध कसं पिणार? पण हे खऱ्या आयुष्यात घडलंय. हत्तीच्या बाळाला बाटलीतून दूध पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाटलीतून दूध पिताना हत्तीच्या बाळाचा व्हिडीओ जो कोणी पाहत असेल, त्याच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडतो, “खूपच क्यूट”.
लोकांना हत्तीचे व्हिडीओही पाहायला आवडतात. कारण हत्ती खूप हुशार असतात आणि ते लवकरच माणसांमध्ये मिसळतात. सध्या हत्तीच्या बाळाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटा हत्ती मानवी मुलांप्रमाणे वावरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हत्तीचे पिल्लू बाटलीत ठेवलेले दूध चक्क चोरून पिताना दिसत आहे. त्यानंतर काय होते ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल.
आणखी वाचा : पृथ्वी ते ब्रम्हांडापर्यंतचा प्रवास तुम्ही कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘वार्ती’ नावाचं हत्तीचं पिल्लू बाटल्यांमधून दूध पिण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. सर्व बाटल्या ट्रॉलीमध्ये एकत्र ठेवल्या होत्या. कोणीही पाहणार नाही या विचाराने हे हत्तीचं पिल्लू चोरून दूध पितोय. शेल्ड्रिक ट्रस्टने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर याचा व्हिडीओ शेअर केलाय. वार्ती हा नेहमी त्याच्या साथीदारांसोबत येतो आणि दूध पिऊन जातो, असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
हा व्हिडीओ २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. “वार्ती हा आपल्या भेटलेल्या सर्वात गोंडस हत्तींपैकी एक आहे… पण तोही दूध पाहून विचित्र खोडकर मस्ती करू लागतो. तो गुपचूप येऊन बाटल्यांमध्ये ठेवलेले दूध पितो, त्याला असं वाटतं की त्याला कोणी पाहणार नाही. पण त्याची जिवलग मैत्रीण माया त्याच्याकडे येते.” असं देखील या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
आणखी वाचा : मशीनच्या वेगाने व्यायाम करणाऱ्या चिनी मुलांचा VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले, ‘छोटे निन्जा’
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : या चिमुकल्याने शोधून काढली कोकरूची आई, हा VIRAL VIDEO पाहून तुमचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावतील
कॅप्शनच्या शेवटी संस्थेने लोकांना तिच्या इन्स्टाग्राम बायोमधील लिंकला भेट देऊन वार्तीची कथा वाचण्याचे आणि त्याचे अनुसरण करण्याचे आवाहन केलं आहे. शेल्ड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्ट (SWT) ही अनाथ हत्तींचे संरक्षण करणारी संस्था आहे. शिकारीमुळे २०१९ मध्ये अनाथ झालेल्या वार्तीची कथा शेअर केली.
आणखी वाचा : OMG! वॉशिंग मशीनमध्ये घुसली मांजर, गोल गोल फिरत राहिली आणि…. पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO
लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट्स करताना दिसून येत आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले की, “मी नुकतंच माझ्या या बेस्ट फ्रेंडला तिच्या ४० व्या वाढदिवसाची भेट म्हणून दत्तक घेतले. आतापर्यंतचा सर्वोत्तम काळ”. यावर SWT कडून रिप्लाय देताना लिहिलं की, “हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला! तुमच्या अतुलनीय भेटवस्तूबद्दल धन्यवाद आणि आम्हाला आशा आहे की तुमच्या मित्राला वार्तीच्या प्रवासाचा एक भाग बनून आनंद मिळेल”. तिसऱ्याने लिहिले, त्यांची खोडकर मस्ती मला खूप आवडली.”