Viral Video: सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ, अशा प्रकारच्या विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या ‘मासूम-मासूम दिल से खेला’ हे गाणं खूप चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजमाध्यमांमुळे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओतील चिमुकली ‘मासूम-मासूम दिल से खेला’या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ‘मासूम-मासूम दिल से खेला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील गोड हावभाव आणि क्यूट डान्स पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. चिमुकलीचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adorable_aanyaa या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत दहा मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत, पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूप सुंदर डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘डान्स छान करतेय, पण पालकांनी योग्य गाण्यांची निवड करून द्यावी’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘क्यूट डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘छोटी हिरोईन.’