तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसतात. सिगारेट ही आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगूनही अनेकजण ती ओढताना आढळून येतात. सिगारेट ओढल्यामुळे लोकांची अवस्था खूप वाईट होते. याची बरीच उदाहरणेही समोर आली आहेत. आतापर्यंत तरुणांमध्ये सिगारेट ओढण्याचं प्रमाण वाढलं होतं हे आपण पाहिलं मात्र, आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच डोक्याला हात लावालं. लोक बिंधास्त बिडी सिगारेट ओढताना दिसतात, मात्र त्याचा चुकीचा परिणाम आपल्या समाजात राहणाऱ्या लहान मुलांवर होत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे ते ड्रग्जच्या आहारीही जातात. नुकताच यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओध्ये तुम्ही पाहू शकता एका चिमुलकीच्या हातात चक्क बिडी दिसत आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे अवघ्या तीन ते चार वर्षांची दिसणारी ही मुलगी हातात जळती बिडी घेऊन उभी आहे. एवढच नाहीतर ही चिमुकली बिडी तोंडाला लावून धूर सोडत आहे. व्हिडीओमध्ये तरी ही चिमुकली घरातच असल्याचं दिसतंय. चिमुकीच्या हातात अशी बिडी देऊन शिवाय कोणतरी व्हिडीओ सुद्धा काढत आहे. या चिमुकलीच्या हातातून बिडी काढून घेणं गरजेचं होतं, मात्र तरीही तिला कोणीही रोखताना दिसत नाहीय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: जेसीबीतून आला ‘यमराज’, तर बोलेरोतून ‘देव’, अपघातातून चमत्कारिक पद्धतीनं बचावला तरुण

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जफर पठाण नावाच्या व्यक्तीने त्याच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलाय. काही जणांनी या गोष्टीला पालक जबाबदार असल्याचं म्हंटलं आहे. तर काहींनी लहान मुलं मोठ्याचं बघून अनुकरण करतात, त्यामुळे मोठ्यांना दोष दिला आहे.