जगात कधी कधी आश्चर्यकारक गोष्टी घडतात आणि आपल्याला अचंबित करून सोडतात. आता हेच बघा ना आसाममध्ये चक्क एक डोळा असणारी बकरी जन्माला आली. तसं अनेकांनी दोन डोकं असलेले प्राणी जन्माला आल्याचे ऐकले असेल पण एक डोळ्याचा प्राणी क्वचितच पाहिला असेल. तेव्हा या एक डोळ्याच्या बकरीला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी चक्क गर्दी केली. मुखरी दास यांच्या घरात हे एक डोळ्याचं बकरीचं पिल्लू जन्माला आलं. विशेष म्हणजे हे पिल्लू चांगलं हिंडू फिरूही शकतं. अशा प्रकारचं पिल्लू जन्माला येणं म्हणजे दैवी चमत्कार असून त्याच्या येण्याने आपल्या घरात सुख येईल असी भोळी श्रद्धा मुखरी दास यांच्या कुटुंबियांची आहे. या एक डोळ्याच्या पिल्लाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मुखरी दास यांच्या घरी तुफान गर्दी केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा