लहान मुलं दिसायला जेवढी गोंडस असतात. लहान बाळांना पाहून आपलं मन प्रफुल्लित होतं. एवढंच नाही तर त्यांना हातामध्ये घेऊन त्यांना घट्ट मिठी मारावी त्यांच्या गालाचा पापा घ्यावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्याचं वागणं, हसणं आपल्याला फारच मोहित करतं आणि आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी कुतुहलाने पाहात असतो. तुम्हाला हे देखील माहित असेल की, लहान मुलं ही सारखी झोपतात. त्यावेळी तुम्ही त्यांना हळूच हसताना देखील पाहिलं असेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बाळ साखरझोपेत असताना गोड स्माईल देताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा या गोंडस बाळाच्या प्रेमात पडाल, हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गोंडस बळ त्याच्या आईच्या कुशीत शांत झोपलेलं आहे. गाढ झोपेत असताना हे बाळ अगदी दिलखुलासपणे हसताना दिसत आहे. नवजात मुलांसाठी झोपेत हसणं खूप सामान्य आहे. अभ्यासानुसार असे म्हटले जाते की, लहान मुलांचं हसणे हे एक एक्सप्रेशन नव्हे तर एक रिफ्लेक्स आहे. मेंदूच्या विशिष्ट हालचालीमुळे ते झोपेत हसतात. जलद डोळ्यांची हालचाल स्वप्नांना कारणीभूत ठरते आणि त्यांच्या स्वप्नांना प्रतिसाद म्हणून बाळ हसतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : महिला आंघोळीसाठी जात होती अन् १२ फूट लांबीचा अजगर दिसला; पुढे जे घडले ते पाहून हादरून जाल

आपल्या बाळाचं असं हसणं हे आईसाठी नक्कीच स्पेशल असणार आहे. हा क्षण तिने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना आईने एक लांबलचक कॅप्शन देखील दिली आहे. यात असं लिहिलं आहे की, “लहान मुलांना जेव्हा झोप येते तेव्हा ते काय स्वप्न पाहत असतील? जेव्हा बाळ हसलं तेव्हा ते माझ्या कुशीत झोपलं होतं.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका व्यक्तीने असा नागिन डान्स केला की नाग बनून दुसऱ्या माणसाच्या अंगावर उडीच घेतली…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Naag Naagin Romance: नदीकिनारी नाग-नागिणीचा रोमान्स, VIRAL VIDEO मध्ये पुढे जे दिसतं ते पाहून थक्क व्हाल!

हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे आणि तो शेअर करताच व्हायरल देखील झाला. लोकांना या व्हिडीओमधलं गोंडस बाळ खूपच आवडू लागलंय. या गोंडस बाळाची स्माईल पाहण्यासाठी लोक हा व्हिडीओ वारंवार पाहताना दिसून येत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. एकूणच हा व्हिडीओ लोकांची मने जिंकत आहे.