माकडांच्या पिल्लांमध्ये एखाद्या गोष्टींविषयी कुतूहल भारीच असते बुवा! मग जोपर्यंत ती गोष्ट त्यांच्या हाती लागत नाही तोपर्यंत ते काही स्वस्थ बसत नाही. अनेकदा तुम्हाला याचा अनुभव खूप जवळून आला असेल. आता हेच बघ ना छतावर बसलेल्या छोट्या मुलाविषयी या पिल्ल्याच्या मनात असे काही कुतूहल निर्माण की त्याने थेट त्याच्याशी गट्टी करण्याचा प्रयत्न केला.

वाचा : श्रीमंत अरबांवर चित्ता, वाघ, सिंह पाळण्यात सौदी सरकारने घातली बंदी

वाचा : मुलायम-अखिलेश सायकलवरुन भांडताना प्रतीक यादवची ५ कोटींच्या गाडीतून सवारी

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. छतावर खेळणा-या एक वर्षांच्या मुलासोबत माकडाच्या पिल्लाने जरा जास्तच जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. माणसाच्या मुलासोबत थोडे खेळून पाहू असे या पिल्लाच्या मनात तर आले नसेल ना? मग काय हे माकडाचे पिल्लू थेट बाळाजवळ गेले अन् त्याच्या सोबत खेळण्याचा प्रयत्न केला. थोडे फार माकड चाळे करून त्याला रिझवण्याचा प्रयत्नही माकडाच्या पिल्लाने केला पण या बाळाला काही हा नवा मित्र फारसा आवडाला नाही. त्यामुळे त्याने रडायला सुरूवात केली. पण असे असताना पळून जाईल तो माकडाचा पिल्लू कसला. त्यानेही आपले प्रयत्न सोडले नाही. त्या ठिकाणावरून रांगत जाणा-या  मुलाचे पाय पकडून या पिल्लाने  त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. राजीव पांडे यांनी युट्युबवर हा व्हिडिओ शेअर केला. फेसबुक व्हॉट्सवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video : संग्रहालयातल्या अस्वलांची दयनीय अवस्था, अन्नासाठी पर्यटकांपुढे लाचारी

Story img Loader