लहान मुलाच्या रडण्याचे कारण शोधणे तसे अवघडच आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चिमुकलीच्या रडण्याचे कारण ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. मुलीचे आई-बाबा तिच्यासमोर जेव्हा ऐकामेंकामधील प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा या मुलीच्या डोळ्यातून गंगा जमूना वाहण्यास सुरुवात होते. एखादे बालक रडण्याच्या पाठिमागे त्याच्याकडील खेळणे दुसऱ्याला देण्याचे अथवा बाळाला  भीती दाखवून रडविण्याचे प्रकार आपण यापूर्वी पाहिले असतील. पण या व्हिडिओतील बेबीच्या रडण्याला तिच्या आई-बाबांचे प्रेम कारणीभूत असल्याचे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ईला नावाच्या चिमुकलीला आपल्या  वडिलांनी आईचे तुंबन घेतलेले बिलकूल आवडत नाही.  जेव्हा ही ईला आपल्या आई बाबांना चुंबन करताना पाहते,  तेव्हा ती चक्क रडायला सुरुवात करते. अबोल ईलाचे इशारे कळल्यानंतर आई बाबा जेव्हा ईलावर प्रेम व्यक्त करण्यासाठी तिचे लाड करायला सुरुवात करतात तेव्हा ही चिमुकली शांत होते. आई-बाबा जेव्हा लाडाने तिचे पापे घेतात तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य  फुलताना दिसते. ईलाच्या वडिलांनी आपल्या मुलीचा व्हि़डिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ साधारण वाटत असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. आई वडिल जेव्हा या मुलीचा पापा घेतात तेव्हा ती या व्हिडिओमध्ये हसताना दिसत आहे.

फेसबुकच्या माध्यमातून आपल्या लेकीचा हा मजेशीर व्हिडिओ ईलाच्या आईने देखील शेअर केला आहे. फेसबुकवर ४ ऑक्टोबरला अपलो़ड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत चक्क १४ दशलक्ष लोकांनी पाहिले आहे. तर हा व्हिडिओ शेअर करण्याचा आकडा आता दिड लाखाच्या घरात पोहचला आहे. आई बाबांचे प्रेम मिळविण्यासाठी अनोख्या अंदाजात व्यक्त होणाऱ्या चिमुकलीच्या स्वभावावर नेटीझन्स प्रतिक्रिया देखील देताना दिसत आहे.