बिहारमधील छपरा शहरातील श्यामचक परिसरातील एका खासगी नर्सिंग होममध्ये सोमवारी १२ जूनच्या रात्री एका विचित्र बाळाचा जन्म झाला. या मुलीला चार हात, चार पाय, दोन हृदयं, दोन स्पाइनल कॉड होते आणि एकच डोकं होतं. नवजात बाळाला पाहून डॉक्टरही थक्क झाले. ही बातमी हॉस्पिटलमध्ये त्वरित पसरली आणि कर्मचारी आणि रुग्णांमध्ये चर्चा सुरू झाली. या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दुःखद बाब म्हणजे जन्मानंतर केवळ २० मिनिटांमध्येच बाळाचा मृत्यू झाला.
बिहारमध्ये जन्मापासून एकमेकांशी जोडलेल्या बाळाचा जन्म
याबाबत नर्सिंग होमचे संचालक डॉ. अनिल कुमार यांनी न्यूज १८ला दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय भाषेत अशा मुलांना कॉन ज्वाइन ट्विन म्हणतात.. जिथे बाळं जन्मापासून एकमेकांशी जोडलेली असतात. भारतासह जगात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात अशा प्रकारे जोडलेल्या मुलांना तज्ज्ञ डॉक्टरांनी ऑपरेशन करून वेगळे केले आहे. पण या मुलीला फक्त एकच डोकं होतं आणि चार-चार हात-पाय, दोन ह्रदयं, दोन पाठीचे कणे होते. ही स्थिती फार कमी लोकांमध्ये दिसून येते.
हेही वाचा – गर्भवती महिलेला जागा देण्यास पुरुषाने दिला नकार! खुर्चीवरुन पेटला नवा वाद, तुम्हीच सांगा चूक कोणाची?
कॉन ज्वाइन ट्विन बाळाचा जन्मानंतर २० मिनिटांत झाला मृत्यू
डॉक्टरांच्या मते, जेव्हा महिलेच्या गर्भाशयात एका बीजातून दोन बाळं तयार होतात तेव्हा असे होते. या प्रक्रियेत जर दोघेही वेगवेगळे झाले तर जुळी बाळं जन्माला येतात, परंतु काही कारणांनी दोघेही वेगळे होऊ शकत नाहीत, अशा स्थितीत कॉन ज्वाइन ट्विन बाळ जन्माला येते. तिच्या जन्माच्या वेळीही गर्भवती महिलेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, ऑपरेशन करून मुलीचा जन्म झाला. मात्र २० मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला.
छपरा येथील श्यामचक येथील संजीवनी नर्सिंग होममध्ये आई प्रिया देवी यांनी बाळाला जन्म दिला. ही महिला रिविलगंज येथील रहिवासी असून हे तिचे पहिले अपत्य होते. पहिल्यांदाच गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याने कुटुंबीय चिंतेत होते. तपासणीअंती बाळाची प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाली. अन्यथा गरोदर महिलेच्या जिवालाही धोका होता. सध्या गर्भवती महिला निरोगी आहे. त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – इंडिगोचं विमान निघालं अहमदाबादला, पोहलचं पाकिस्तानमध्ये! अर्ध्या तासानंतर आलं भारतात
या मुलीच्या जन्मानंतर ही बाब लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरली. निसर्गाचे हे आश्चर्य पाहण्यासाठी नर्सिंग होममध्ये मोठी गर्दी झाली होती. काहींनी या बाळाला देवीचा अवतार म्हणून पाहिले तर काहींनी जैविक विसंगती म्हणून पाहिले.