आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये कायम पुरुष अधिकाऱ्यांचे वर्चस्व राहीले आहे. तेच या मळ्यांचे प्रमुख म्हणून काम करतात. पण आता ही परंपरा एका महिलेने तोडली आहे. तब्बल २०० वर्षांनंतर पहिल्यांदाच याठिकाणी चहाच्या मळ्याची व्यवस्थापक म्हणून एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. १८३० मध्ये इग्रजांद्वारे तयार करण्यात आलेल्या बागांमध्ये अधिकारी म्हणून पुरुषांची नियुक्ती केली जात होती. मात्र आता पहिल्यांदाच महिलेची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महिलेचे नाव आहे मंजू बरुआ. आसाममधील डिब्रूगढ येथे राहणाऱ्या मंजू या एपीजे चहाच्या हिलिका टी इस्टेटमध्ये व्यवस्थापक म्हणून रुजू झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जवळपास २०० वर्षांपासून चहाच्या मळ्याची देखभाल करण्याची मक्तेदारी होती. मात्र ४३ वर्षांच्या मंजू यांना आता हा व्यवस्थापक बनण्याचा मान मिळाला आहे. मंजू यांनी वेलफेअर ऑफीसर म्हणून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. आपल्या या नवीन संधीविषयी सांगताना मंजू म्हणतात,  काही वेळा सवयीनुसार अनेक कर्मचारी मला मॅडम ऐवजी सर म्हणतात. पण ही गोष्टही एक महिला अधिकारी म्हणून मला आवडते असे मंजू यांनी स्पष्ट केले.

मंजू आपले काम अतिशय चोखपणे पार पाडतात. या चहाच्या मळ्याची पाहणी करण्यासाठी त्या १५६४ एकरांच्या परिसरात बाईकवर फीरुन आपले कर्तव्य बजावतात. अशाप्रकारे एका महिलेने चहाच्या मळ्यात व्यवस्थापक पदावर काम करणे हा परंपरेनुसार मोठा बदल आहे असे म्हणता येईल, मात्र हा निश्चितच एक चांगला बदल आहे. चहाच्या मळ्यात बाहेरची कामे जास्त असतात. तसेच यासाठी शारीरिक क्षमता अतिशय चांगल्या असण्याची आवश्यकता असते. मात्र महिलांकडेही या क्षमता असतात हेच या बदलाचहाच्या मळ्यांमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांना ‘बडा साहब’ म्हणण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे मला आता सगळे बडी मॅडम म्हणतात.तून दिसून येईल. चहा उद्योगात कर्मचाऱ्यांना खूप महत्त्व असून यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचाच सहभाग लक्षणीय असतो असेही मंजू यांनी सांगितले. याआधी चहाच्या मळ्यांमध्ये वरिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक आणि वेलफेअर ऑफीसर म्हणून महिलांनी काम केले आहे. मात्र व्यवस्थापक पदावर रुजू होणाऱ्या मंजू या पहिल्या महिला आहेत.