Badlapur Crime, Kolkata Doctor Rape Case: कोलकात्याच्या निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात आंदोलनं, निदर्शनं सुरू आहेत. अनेक राज्यांमधील रहिवासी डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. ही घटना ताजी असतानाच बदलापूरमधून आणखी एक संतापजनक घटना समोर आली, यामध्ये एका नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर सध्या बदलापूरमध्ये पालकांनी संताप व्यक्त केला आहे. संतप्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला, तर दुसरीकडे संतापलेल्या पालकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात ठिय्या मांडला.

भर चौकात झळकवली पाटी

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Bride dance in her own wedding for groom after seeing his groom on stage bride video goes viral on social media
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Woman vulgar dance at tribute meeting video viral on social media
असे लोक येतात तरी कुठून? आजी आजोबांच्या श्रद्धांजली सभेत तरुणीने केली हद्द पार, स्टेजवर गेली अन्…, VIDEO पाहून संताप होईल अनावर
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”

दरम्यान, या संतप्त पालकांनी हातात पोस्टर घेऊन ‘आम्हाला लाडकी बहीण योजना’ नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको, आमच्या मुलीच सुरक्षित नसतील तर आम्ही काय करावं? असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केला जात असताना एका तरुणानं भरचौकात पाटीद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे. या पाटीवर लिहिलेल्या ओळी खरंच विचार करायला भाग पाडत आहे. या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“स्वत:च्या बहिणीसाठी वाघ अन् दुसऱ्याच्या…”

खरं तर समाजातून असल्या नराधमांना नाहीसं करायचं असेल तर प्रत्येकाला याची सुरुवात ही स्वत:च्या घरापासून करावी लागेल. यावेळी फक्त मुलीलाच काळजी घ्यायला न सांगता मुलालासुद्धा जबाबदारीने वागायचे संस्कार दिले गेले पाहिजे. या तरुणानं या पोस्टरवरही असाच काहीसा रोष व्यक्त करत समाजाला आवाहन केलं आहे. या पोस्टरवर “मित्रा, जर स्वत:च्या बहिणीसाठी वाघ असशील तर दुसऱ्यांच्या बहि‍णीसाठी पिसाळलेला कुत्रा होऊ नकोस”, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: स्वतः ऑटो चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला; तपासताना मान टाकली अन् डॉक्टरांसमोरच मृत्यूनं गाठलं

सोशल मीडियावर jay_suryawanshi_190 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?

बदलापूर पूर्वमध्ये एका नामांकित शाळेत शिकत असलेल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने १६ ऑगस्टला शाळेमध्ये जाण्यास नकार दिला होता. घरच्यांनी सांगितल्यानुसार ती शाळेत जायचं म्हटलं की प्रचंड घाबरली होती. प्राईव्हेट पार्टच्या ठिकाणी तिला त्रास होत असल्याचं तिने घरी सांगितलं. त्यानंतर घरच्यांनी तिला दवाखान्यात नेलं, त्यावेळी डॉक्टरांनी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची माहिती दिली.

कोलकातामध्ये नेमकं काय घडलं ?

कोलकाता शहरात एक घटना घडली अन् देश हादरला… कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संजय रॉय असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा रुग्णालयातील कर्मचारी नव्हता, पण तो सतत या रुग्णालयात येत होता. शुक्रवारी सकाळी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. तिच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, जेवल्यानंतर डॉक्टर काही वेळ विश्रांतीसाठी हॉलमध्ये गेली होती. या काळात रात्री ३ ते पहाटे ६ च्यादरम्यान ही घटना घडली.

Story img Loader