Badlapur Case video : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं आज अख्खा महाराष्ट्र हादरला. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे बदलापूरमधील प्रत्येक जण हळहळला आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला. बदलापूरकरांनी प्रशासनाला धारेवर धरले आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकवा, असा एकच सूर लावून धरला. या सगळ्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओवर सर्व स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, सध्या बदलापूरमधूनच एक वेगळा व्हिडीओ समोर आला असून, त्यामधून बदलापूरकरांच्या माणुसकीचे दर्शन झालेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूरकरांच्या माणुसकीचं दर्शन

काल जवळपास १० तास बदलापूर स्थानकावरील रेल्वे सेवा बंद होती. आंदोलकांनी बदलापूर स्थानकावरून एकही रेल्वेगाडी पुढे जाऊ दिली आहे. त्यामुळे लोकल सेवेसोबतच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीचाही खोळंबा झाला होता. रेल्वेतील प्रवाशांसाठी खाण्या-पिण्याची काहीच सोय नव्हती. अशी परिस्थिती स्थानिक लोकांनी पुढाकार घेत रेल्वे प्रवाशांसाठी जेवणाची सोय केली. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही संस्था आणि स्थानिक लोकांनी मिळून रेल्वे प्रवाशांसाठी जेवण बनवून दिले. त्यांच्यासाठी खिचडी बनवली होती. ही खिचडी त्यांनी रेल्वेगाडीत जाऊन प्रवाशांना दिली होती. त्यामुळे रेल्वेगाडीतील कोणताही प्रवासी उपाशी राहिला नाही. माणसांनी माणुसकी दाखवीत या प्रवाशांना मदत केली. त्यामुळे बदलापूरकरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; लोकांच्या किंकाळ्या अन् भूस्खलनाचा काळजात धडकी भरवणारा VIDEO

हा व्हिडीओ hello_mumbai_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ही दुर्घटना ताजी असताना अशीच एक धक्कादायक घटना आज बदलापूर शहरातून समोर आली आहे. त्यात चार वर्षांच्या चिमुरडीवर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सध्या या घटनेच्या निषेधार्थ राज्यात तीव्र पडसाद उमटताना दिसून आले आहेत. बदलापूरमध्ये या दुर्घटनेला हिंसक वळण लागले आहे. त्यानंतर आणखी एक संतापजनक दुर्घटना घडल्याचे वृत्त ठाण्यातील कळवा रुग्णालय परिसरातून समोर आले आहे. त्यात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीने केलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur school case badlapur video of people help railway passengers video goes viral on social media srk