चौक आणि रस्त्यांना दिलेली नाव यावरून एखाद्या ठिकाणचा पत्ता शोधणं सोपं होतं. एखाद्या ठिकाणची खूणही पत्ता शोधण्यास महत्त्वाची ठरते. तलावाजवळ, मंदिराजवळ, अमुकतमूक ठिकाणाजवळ हे आपण नेहमीच अनुभवतो. मात्र बदलापुरात सध्या एका बंगल्याची जोरदार चर्चा आहे. त्या बंगल्याच्या नावावरून सध्या त्या परिसराची ओळख निर्माण झाली आहे. मुकुंद खानोरे यांनी ज्या क्षेत्रामुळे नाव कमावलं, त्या क्षेत्राचं नाव त्या बंगल्याला दिलं आहे. ‘शेअर मार्केटची कृपा’ हे नाव अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

मुकुंद खानोरे हे मूळचे बदलापूर येथे राहणारे आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर बारीकसारिक गोष्टींचा अभ्यास करत त्यांनी मार्केटमध्ये जम बसवला. इतक्या वर्षांच्या अनुभवातून खानोरे यांनी शेअर मार्केटमध्ये नाव आणि पैसे कमावले. शेअर मार्केटमध्ये नाव कमवल्यानंतर कोट्यधीश झालेल्या खानोरे यांनी बदलापुरातील कासगावमध्ये मोठी जागा विकत घेतली. या जागेत लहानपासून पाहिलेलं बंगला बांधण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. तसेच ज्या क्षेत्रामुळे हे स्वप्न पूर्ण झालं त्या क्षेत्राचं नाव त्यांनी आपल्या बंगल्याला दिलं. ‘शेअर मार्केटची कृपा’ असं नाव त्यांनी आपल्या बंगल्याला दिलं आहे.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Executive Trustee of Bharatiya Unit Trust and apex body of mutual funds A P Kurian
बाजारातली माणसं : फंड उद्योगाचा पायाचा दगड, ए. पी. कुरियन

Video: २७ वर्षांच्या तरुणीने ६ वर्षात कमावले १२० कोटी; आता सोशल मीडियावर देते इतरांना टिप्स

शेअर मार्केटमुळे आपल्याला आर्थिक भरभराट झाल्याचं मुकुंद यांनी सांगितलं आहे. यश ज्या क्षेत्रामुळे मिळालं त्या क्षेत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी बंगल्याला असं नाव दिल्याचं सांगितलं आहे. शेअर मार्केटमधील तज्ज्ञ म्हणून आज मुकुंद खानोरे यांचा नावलौकिक आहे. अनेक जण त्यांच्याकडून आजही शेअर मार्केटचे धडे गिरवत आहेत.

Story img Loader