बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप, तसेच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा फडकवला आहे. पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. तर ‘टिम कूक’ हे ॲपलचे (Apple Inc) सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व संचालक मंडळाचे सदस्य आहेत. आयफोन बनवणाऱ्या ॲपलचे सीईओ टिम कूक आहेत. आज या दोन्ही खास व्यक्तींची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर पी. व्ही. सिंधू यांची पोस्ट व्हायरल होत आहे; ज्यात तिने ॲपल सीईओ कूक यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे.भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू अलीकडेच कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील ॲपल पार्क येथे एका खास कार्यक्रमाला गेली होतो आणि तिथे तिची भेट ॲपलचे सीईओ टिम कूक यांच्याशी झाली. तसेच टिम कूकला प्रत्यक्ष भेटण्याचा बहुमान मिळाल्याचा आनंद तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पोस्ट नक्की बघा :
पी. व्ही. सिंधूने घेतली ॲपलच्या सीईओची भेट :
भारतीय शटलर पी. व्ही. सिंधूने कॅलिफोर्नियातील एका लॉन्च इव्हेंटमध्ये ॲपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत संवाद साधतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ॲपलने मंगळवारी यूएस येथील मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान आयफोन १५ (Iphone15) मालिका सादर करण्यासह आयफोनचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम कंपनीच्या क्युपर्टिनो, यूएस येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेती ठरलेली पी. व्ही. सिंधू या कार्यक्रमात सहभागी झाली होती. तसेच या कार्यक्रमादरम्यान तिची भेट ॲपलच्या सीईओ टिम कूक यांच्याशी झाली आणि हा अनुभव तिच्यासाठी खास ठरला.
पी. व्ही. सिंधूने ॲपलच्या सीईओसोबतचा सेल्फी @pvsindhu१ या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर केला आणि तो क्षण “अविस्मरणीय” असल्याचे म्हटले आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “ॲपल क्युपर्टिनो कीनोटच्या दिवशी टीम कूकची भेट हा एक अविस्मरणीय क्षण होता. “मला भेटल्याबद्दल धन्यवाद टिम कूक. अप्रतिम ॲपल पार्क पाहून आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला”, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत सिंधूने तिच्या अविस्मरणीय क्षणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या आणि तिला दिलेल्या निमंत्रणाबद्दल टिम कूकचे आभार मानले. पी. व्ही. सिंधूने पुढील भारतभेटीदरम्यान टीम कूक यांना तिच्यासोबत बॅडमिंटन खेळण्याची ऑफरदेखील दिली आहे. सध्या ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक जण या फोटोवर विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत.