जगभरातील विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकामध्ये नेहमीच अनोख्या रेकॉर्डची नोंद होत असते. तर बॅडमिंटनमध्ये ‘सर्वात वेगवान स्मॅश’ मारून एका खेळाडूने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवले आहे. बॅडमिंटन स्टार सात्विकसाईराज रंकीरेड्डीने हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवला आहे. तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्राचे पार्सल उघडतानाचा वडिलांबरोबरचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
२३ वर्षीय बॅडमिंटन स्टार सात्विकसाईराज रंकीरेड्डीने बॅडमिंटनमध्ये अविश्वसनीय ५६५ किमी प्रतितास वेगाने स्मॅश मारून ‘सर्वात वेगवान हिट’ करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला आहे. १४ एप्रिल २०२३ रोजी इंडोनेशिया ओपनमध्ये हा जागतिक विक्रम नोदंवला गेला. त्या दिवसाच्या वेग मोजण्याच्या परिणामांवर आधारित गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत न्यायाधीशांद्वारे याची पुष्टी करण्यात आली, तर आता बॅडमिंटन स्टार सात्विकसाईराज रंकीरेड्डीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
पोस्ट नक्की बघा :
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पार्सल अन् वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद :
बॅडमिंटन स्टार सात्विकसाईराज रंकीरेड्डीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, खेळाडूचे वडील काळजीपूर्वक पार्सल उघडत आहेत आणि आपल्या लेकाला मिळालेले गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र पाहून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसतो आहे . तसेच रंकीरेड्डीने आई-वडिलांबरोबर प्रमाणपत्र हातात घेऊन काही फोटोही शेअर केले आहेत.एकदा तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ बघा.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डीने @satwiksairaj या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ५ डिसेंबर रोजी शेअर केला आहे आणि व्हिडीओला “माझे शटल ५६५ किमी प्रतितास वेगाने असताना, मला वडिलांच्या अभिमानाचा खरा वेग जाणवला. माझ्या हृदयातील एक अतूट विक्रम.” #गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असे कॅप्शनदेखील दिले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘हृदयस्पर्शी व्हिडीओ’, वडिलांच्या चेहऱ्यावर लेकासाठी अभिमान दिसतो आहे’, अशा अनेक सुंदर आणि भावूक कमेंट करताना दिसून आले आहेत.