Baffalo Dance Video Viral : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. काही व्हिडीओ हे तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडणारे असतात. तर काही व्हिडीओ हे तुम्हाला खळखळून हसवणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर आपल्याला हसू आवरणं अवघड होऊन जातं. पण कधी कधी असं काही डोळ्यांसमोर येतं, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. असाच एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडीओ एका म्हशीचा आहे. आपल्या मालकाचा आदेश पाळणाऱ्या कुत्र्यांचे, माकडांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण या व्हिडीओमध्ये मालकीणीचा आदेश पाळणारी म्हैस दिसून येतेय. तुम्ही कधी म्हशीला डान्स करताना पाहिलंय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी म्हशीला चारण्यासाठी तिच्याजवळ येते. तिथे येऊन ती म्हशीला चारा देते. त्यानंतरही या मुलीला एक गंमत सुचते. चार खात असलेल्या म्हशीला एक आदेश देते. या म्हशीला ती नाचायला सांगते. सुरुवातीला या म्हशीला काही ऐकू येत नाही, पण जेव्हा ही मुलगी स्वतः नाचू लागते तेव्हा ती म्हैसही उड्या मारून नाचू लागते. ही मुलगी जितक्या वेळा तिला नाचायला सांगेल तितक्या वेळा ती म्हैस नाचू लागते. हे पाहून तिथे उभे असलेल्या लहान मुलांना देखील आपलं हसू आवरत नाही. ते सुद्धा खळखळून हसू लागतात. म्हशीचा हा जबरदस्त डान्स पाहून ते ही या गमतीचा आनंद घेताना दिसून येतात.

आणखी वाचा : Navratri 2022 : माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा डान्स; पाहा Viral Video

म्हशीने केलेला असा डान्स तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल. हे दृश्य खरंच पाहण्यासाठी फारच मजेदार आहे. आतापर्यंत कुत्रे आणि मांजरी हे पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात मजेदार-प्रेमळ मानले जातात. पण हा भ्रम या व्हिडीओने मोडून काढलाय. कारण यात म्हशीची मजेदार स्टाईल लोकांना फार आवडू लागली आहे. म्हशीच्या या डान्सपुढे बड्या बड्या अभिनेत्रींचे डान्स सुद्धा फिके पडू लागतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! ११ हजार वोल्टच्या विजेच्या तारांवर झोका खेळू लागला हा मुलगा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : गाडी फुल स्पीडमध्ये असताना हरणाने इतक्या उंच उडी मारत रस्ता ओलांडला

हा मजेदार व्हिडीओ videonation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.