तुम्हाला कदाचित आठवत असेल की काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका ड्रेसचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यात त्याचा अचुक रंग ओळखण्याची जणू स्पर्धाच सुरू होती. या ड्रेसचा रंग नेमका कोणता हे कोणलाच सांगता येते नव्हते. अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. ट्विटरवर तर या बॅगच्या रंगावरून वादविवाद सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच Whyofcorso या ट्विटर अकाऊंटवरुन एका बॅगेचा फोटो टाकण्यात आला. ‘माझी नवीन निळ्या रंगाची बॅग पहा’ अशा प्रकराची ओळ त्या फोटोवर टाकण्यात आली. यावर एकाने ‘ही बॅग निळ्या रंगाची नसून पांढ-या रंगाची आहे. त्यामुळे आपली चुक सुधारा’ अशा प्रकारची कमेंट केली. त्यानंतर ट्विटरवर या बॅगेच्या रंगावरुन वादाला सुरूवात झाली. corso ही आपल्या पोस्टवर ठाम आहे. ही बॅग निळ्या रंगाचीच आहे असे तिचे ठाम मत आहे. तर दुसरीकडे तिला अनेकांनी वेड्यात काढून ही बॅग पांढ-या रंगाची आहे असे सांगत तिची खिल्ली उडवली आहे. शेवटी तिने ही बॅग ज्या कंपनीकडून विकत घेतली त्याचा फोटो टाकला आहे. यात या बॅगचा रंग हा ‘मिस्टिक ब्लू’ असा दिला आहे. मिस्टिक ब्लू ही निळ्या रंगाची एक शेड असून हा रंग जवळपास पांढ-या रंगासारखा दिसतो. आता पुरावे देऊनही  ही बॅग पांढरी नसून निळी आहे यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे ट्विटरवर या बॅगेचा रंग हा चर्चेचा विषय बनला आहे.

Story img Loader