सोशल मीडियाचे जग लाखो व्हिडीओंनी भरलेले आहे. दररोज इथे मोठ्या प्रमाणात व्हिडीओ पाहिले आणि अपलोड केले जातात. पण त्यातील काही मोजकेच लोक आपल्या व्हिडीओंमधून आपली छाप सोडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडीओ एका वृद्ध भिकाऱ्याचा आहे. या वृद्ध भिकाऱ्यासोबत एकाने पंगा घेतला. त्यानंतर या भिकाऱ्याचा राग अनावर झाला आणि मग जे चित्र दिसलं ते पाहून पाहणारे केवळ पाहतच राहिले. रागाच्या भरात या भिकाऱ्याने चक्क पैशांचा पाऊसच पाडला. त्याच्याकडील हजारो रुपये आणि मालमत्तेचे कागदपत्र हवेत भिरकावले. हा व्हिडीओ पाहून सारेच हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध भिकारी फ्रेममध्ये असल्याचं तुम्हाला दिसेल. तो कुठल्यातरी स्टेशनच्या बाहेर बसलेला दिसून येत आहे. त्याच्या हातात पॉलिथिनच्या पिशवी असल्याचं दिसून येत आहे. रागाच्या भरात पिशवीला पुन्हा पुन्हा झाडून काढताना दिसतोय. त्या पिशवीमधून नोटा आणि काही महत्त्वाचे कागद पडत असल्याचं दिसून येतंय.
आणखी वाचा : चक्क विमानातच एअर होस्टेसने केला ‘Pushpa’ डान्स, एका चुकीमुळे आली चर्चेत, पाहा हा VIRAL VIDEO
त्या वृद्ध भिकाऱ्याचे वेगवेगळे कागदपत्र आणि रुपयांच्या नोटा खाली जिकडे तिकडे विखुरलेलं स्पष्टपणे दिसत आहेत. यानंतरही भिकाऱ्याचा राग काही कमी होताना दिसत नाही. कोणाच्या तरी बोलण्याने तो भयंकर चिडलेला दिसतोय. त्याने फेकलेल्या नोटांमध्ये १०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा दिसत आहेत. इतकंच नव्हे तर त्याच्या बॅगेतून प्रॉपर्टीची कागदपत्रे पडताना पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बकरीसोबत व्हिडीओ शूट करणं पडलं महागात, मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
समोर आलेला हा व्हिडीओ पाहून असं दिसतंय की, एका व्यक्तीच्या बोलण्यावर हे आजोबा संतापले आणि त्यांनी समोरच्याला दाखवण्यासाठी सोबत ठेवलेले नोटांचे बंडल हवेत उडवले. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आजोबा एका ठिकाणी बसले आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व नोटा हवेत उडवून दिल्या आहेत. नोटांमध्ये दहा, पन्नास आणि शंभरच्या नोटा स्पष्ट दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड करून एका यूजरने नागदा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडल्याचं सांगितलं. या व्हिडीओमध्ये भिकाऱ्याने हातात रुपयांचे बंडल घेऊन नोटांचा अक्षरशः पाऊसच पाडला. त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले.
आणखी वाचा : हत्तीणीचं दूध पिऊ लागली ही चिमुकली, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : असा खतरनाक नागिन डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल, VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही
हा व्हिडीओ giedde नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. चार दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की अवघ्या चार दिवसात या व्हिडीओला ३९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर पाच हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भरभरून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही युजर्सनी तर या व्हिडीओवर वेगवेगळे विनोद शेअर केले आहेत. हे कमेंट्स वाचण्यासारख्या आहेत.