बहारिनचे परराष्ट्रमंत्री खालिद बिन अहमद अल खलीफा यांनी सगळ्यांची मने जिंकून घेतली आहे. याला कारणही तसेच आहे. गेली २१ वर्षे त्यांच्या घरी निष्ठेने काम करणा-या आपल्या मोलकरणीचा फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला. काही दिवसांपूर्वी ते भारतभेटीला आले होते तेव्हा आपल्या घरी काम करणा-या आपल्या मोलकरणीच्या घरी त्यांनी आवर्जुन भेट दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : शेती करण्यासाठी इंजिनिअरने आपली कंपनी विकली

असं म्हणतात की जर माणसांना ओळखायचे असेल तर आपल्या हाताखाली काम करणा-या व्यक्तीशी तो कसे वागतो हे पाहावे. त्यांच्या वागणूकीचा खरा अंदाज आपल्याला येतो. कदाचित म्हणूनच बहारिनचे परराष्ट्र मंत्री खलिद बिन अहमद अल खलीफा हे खूप चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी ते भारतात आले होते तेव्हा त्यांनी केरळात राहणा-या आपल्या मोलकरणीच्या घराला आवर्जुन भेट दिली. लायला या त्यांच्या घरी २१ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या कोल्लम येथील घरात खालिद गेले होते. त्याचा सेल्फी काढून त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला. गेल्या २१ वर्षांत लायला हिने प्रेम, निष्ठेने आमची सेवा केली असा प्रेमपूर्ण संदेश त्यांनी लिहिला. बघता बघता ही पोस्ट व्हायरल होऊ लागली. नेते मंडळी नेहमीच आपल्या मुलांसोबत किंवा राजकारणांसोबत फोटो काढत असतील पण आपल्या घरात काम करणा-या मोलकरणीसोबत फोटो काढून तिचे आभार मानणारा नेता क्वचितच पाहायला मिळतो.

PHOTOS 2016 : या वर्षातील सगळ्यात धक्कादायक घडामोडी