Viral Video: सासू आणि सूनेमध्ये होणाऱ्या वादाचे अनेक किस्से तुम्ही नक्की ऐकले असतील. त्यांच्यामध्ये होणारी भांडण, वाद याच्या अनेक बातम्या किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कधीही पाहिले नसेल. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुनेने चक्क आपल्या सासुसमोर आयटम सॉंगवर डान्स केला आहे आणि त्यावर सासूने दिलेली प्रतिक्रिया देखील मजेशीर आहे. सासू आणि सुनेमध्ये असणारे चांगले नाते यातून दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सासू किचनमध्ये जेवण बनवत आहे. दुसरीकडे, सून साडी नेसून स्वयंपाकघरात ‘लत लग गई’ गाण्यावर नाचू लागते. सून मध्येच नाचत असताना सासूकडे जाते आणि तिच्या समोर देखील ठुमके द्यायला सुरुवात करते. सुनेचा डान्स पाहून सासू देखील हसायला लागते. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा मजेशीर व्हिडिओ तुम्ही देखील पहा.

( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)

महिलेचा भन्नाट डान्स एकदा पाहाच

व्हिडिओने मनोरंजन केले

सासू आणि सुनेच्या जोडीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओला खूप पसंती देत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकेच नाही तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या आणि मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Story img Loader