Funny Viral Video : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण हसणं विसरतायत. रोज सकाळी उठल्यानंतर आवरून कामावर जायची घाई, कामावरून आल्यानंतर मिळणाऱ्या वेळेत घरची कामं; या सर्व गोष्टींमध्ये सगळेच कुठे तरी टेन्शन, तणावाखाली जगतायत. स्वत:ला देण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरील हसू कुठे तरी गायब होतय. पण, याच हसण्याची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही फक्त हसणारचं नाही तर लोटपोट होऊन जोरजोरात हसाल. या व्हिडीओत काही काकू इतक्या भन्नाट, जबरदस्त पद्धतीने हसतायत की पाहून अनेकांना गब्बर सिंग, तर काहींना रावणाच्या बहिणींची आठवण झालीय.
तुम्ही आत्तापर्यंत एखादा विनोदी व्हिडीओ पाहून हसला असाल किंवा एखाद्या व्हिडीओतील कृती पाहून खूप हसला असाल, पण आता तुम्ही हसण्याचा व्हिडीओ पाहूनच जोरजोरात हसाल. होय, कारण या व्हिडीओतील काही काकू इतक्या विचित्र पद्धतीने हसतायत की असं हसणं तुम्ही आयुष्यात कधी ऐकलं नसेल. पण, हे हसणं फारचं मजेशीर आहे, त्यामुळे तुमच्यात पेशन्स असतील तर या सर्व काकूंचं हसणं तुम्ही नक्की ऐकाल.
हसण्याची अशी स्टाईल तुम्ही कधी पाहिली आहे का?
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमाच्या स्टेजवर सात-आठ काकू एकत्र उभ्या आहेत. या सर्वांकडे हसण्यासाठी एक एक करून माईक दिला जातो. यावेळी पहिल्या काकू माईक हातात घेतात आणि जोरजोरात हसायला सुरुवात करतात. त्या जसं जोरात हसू लागतात, ते ऐकून उपस्थित लोकंही खूप हसतात. कारण त्यांचं हसणं ऐकून अनेकांना शोलेमधल्या गब्बर सिंगची आठवण झाली, तर काहींना रावणाची बहीण आठवली. त्यानंतर दुसऱ्या काकूंकडे माईक दिला जातो, त्या देखील एकदम लयात हसू लागतात. त्यानंतर तिसऱ्या काकूंकडे माईक जातो, त्या अशा काही हसतात की अनेकांना प्रश्न पडतो की त्या नक्की हसतायत की ओरडतायत. अशाप्रकारे एक एक जणी आपल्या हसण्याची वेगळी स्टाईल दाखवतात.
धाडसी आणि संयमीच लोक हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघू शकतात.
हसण्याचा हा मजेशीर व्हिडीओ @marathi_memer_2.0 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकांनीही भन्नाट-भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. कमेंटमध्ये एका युजरने म्हटलेय की, हसणं बघून मी मरता मरता वाचलो, लवकर व्हिडीओ बंद केला म्हणून बरं झालं नाहीतर…, दुसऱ्याने म्हटलेय की, ह्यांना हसताना बघूनच हसायला येतय. तिसऱ्या युजरने म्हटले की, मी खूप धाडस करून हा व्हिडीओ बघितला, मरेन किंवा वाचेन म्हणून… चौथ्याने म्हटलेय की, रावणाचा बहिणी आल्यात.. शेवटी एकाने म्हटले की, पिवळ्या साडीवाल्या मावशी जेव्हा हसल्या, तेव्हा वाटलं भूकंप झाला की काय… अशाप्रकारे युजर्स एकापेक्षा एक अशा हास्यास्पद कमेंट्स करत आहेत.