नागराज मुंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटाने ख-या अर्थाने लोकांना वेड लावले आहे असेच म्हणावे लागेल. कारण सैराटची जादू लोकांच्या मनावर इतकी चढली आहे ती काही केल्या कमी होत नाही. कुठे आर्चीला, परश्याला बघायला धक्का बुक्की होते, तर कुठे वाहतुक कोंडी इतकी की शेवटी पोलिसांना गर्दीला आवर घालण्यासाठी पाचारण करावे लागले. तर कुठे या गर्दीचा फायदा घेत चोरीही होते. आता या घटना नेहमीच्याच.
तर दुसरीकडे काही फॅन असे आहेत की ज्याने सैराटपासून प्रेरणा घेत काही भन्नाट प्रकार केले आहेत ते वेगळेच. कोणी आपली बाईक सैराटच्या पोस्टरने रंगवून घेतली तर कोणी हा चित्रपट पाहण्याचा विक्रमच मोडून टाकला. गणपतीच्या सजावटीसाठी देखील आर्ची परश्याचे पुतळे बनवले जात आहे. आता तर एका सैराट प्रेमीने आपला बैल तसाच रंगवला आहे. आज बैलपोळा आहे. यादिवशी बळीराजा आपल्या बैलांना आंघोळ घालून, रंगरंगोटी करून, झूल पांघरून सजवतो. तशी परंपराच आहे. झूल पांघरून, रंगरंगोटी केलेल्या बैलाची पूजा करून मिरवणूक काढली जाते. सध्या अशाच एका बैलाचा फोटा व्हॉट्स अॅप, फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या बैलांच्या मालकाने ‘सैराट झालं जी’ आणि ‘झिंगाट’ या गाण्याची काही अक्षरे आपल्या बैलांच्या पाठीवर लिहली आहेत. हा फोटो कोणाच्या बैलांचा आहे किंवा कोणत्या ठिकाणचा आहे हे मात्र समजले नाही पण बैलपोळ्यानिमित्त व्हॉट्स अॅपवर फिरतोय हे नक्की.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा