Viral Video : सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडीओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. मात्र, काही व्हिडीओ असे असतात की; जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडीओ अनेकदा धडकी भरविणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता गावोगावी यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत हे मुख्य आकर्षण ठरत आहे. दरम्यान, अशाच एका बैलागाडा शर्यतीचा थरारक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या बैलांचं कौतुक कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ग्रामीण भागात यात्रोत्सवात अनेकांना बैलगाड्यांच्या शर्यतींची क्रेझ असते. या शर्यती भलत्याच रंगात येताना पाहायला मिळतात. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी अगदी नीट बोलायला न येणारे बाळ ते वयोवृद्धही येत असतात. अशातच फळीफोड पाहण्यासाठी बैलगाडा घाटाच्या दुतर्फा बसलेले बैलगाडा शौकीन आणि गाडा सुटताच दिली जाणारी आरोळी अशा या वातावरणाने घाटात मोठा थरार पाहायला मिळतो.

ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत

असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, LP नावाचा बैल आणि पेठकरांचा राजा अशा दोन बैलांच्या जोड्या आणि आणखी बैलजोड्या अशी शर्यत लागली आहे. त्यामध्ये या बैलांना मार्गदर्शन करण्यासाठी या गाड्यांमध्ये एकेक व्यक्तीही दिसत आहेत. ते बैलांना योग्य दिशा दाखवीत, शर्यत जिंकण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम करतात. या शर्यतीत एकूण तीन बैलागाड्या दिसत आहेत म्हणजेच एकूण सहा बैल आहेत. यावेळी बैलसुद्धा शर्यत जिंकण्यासाठी वेगाने पळताना दिसत आहेत. अखेर मागून येऊन एक बैलगाडा पुढे जात शर्यत जिंकतो. ही बैलगाडा शर्यत पूर्वीपासून भरवली जाते. शेतातील हंगाम संपल्यानंतर ग्रामदैवताच्या ठिकाणी जत्रा, उरूस भरवून या शर्यतीचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रात काही ठिकाणी बैलगाडा शर्यतीला छकडा किंवा शंकरपट, असंसुद्धा म्हणतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘आमच्याकडे एका फटक्यात दारू सोडवून मिळेल’ व्यसन सोडवायला आलेल्या मद्यपीला खतरनाक ‘प्रसाद’; VIDEO पाहून पोट धरून हसाल

खिल्लार जातीच्या बैलांना प्राधान्य

खिल्लार जातीच्या बैलांना या शर्यतीसाठी विशेष मान असतो. या बैलांचे गुणधर्म म्हणा किंवा शारीरिक वैशिष्ट्य असं की, ज्याप्रमाणे घोडा धावतो, त्याप्रमाणे खिलार जातीच्या बैलांची धावण्याची क्षमता असते. ही बाब वैद्यकीय अहवालानुसार सिद्ध झाली आहे. बैलाचा बांधा, त्याची जात, त्याचा रंग, त्याचा रुबाबदारपणा, त्याचे शिंग हे सगळं व्यवस्थित पाहिलं जातं. त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही केल्या जातात. त्यांना जंताची औषधेदेखील दिली जातात.अशा प्रकारे गावागावात, जिल्ह्याजिल्ह्यांत बैलगाडा शर्यत हा प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. बैलगाडा शर्यत ही अनेक गाडामालकांसाठी एक आगळीवेगळी मेजवानी असते. तसेच पंचक्रोशीत मान मिळवून देणारा बैल हा त्यांच्या दृष्टीने कुटुंबातील सदस्याइतकाच महत्त्वाचा असतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर sachinkolekar_photography नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओला ‘विजय नेहमी शांततेत मिळवायचा, लोकांना वाटत गेलं पाहिजे की, आपण हरतोय’ अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओवर बैलगाडाप्रेमींकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एकानं प्रतिक्रिया देत “ओव्हरटेक” असं म्हटलंय. तर दुसऱ्यानं “नाद एकच बैलगाडा शर्यत”, असं लिहिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bailgada sharyat shocking video goes viral on social media bailgada sharayat permission srk
First published on: 27-06-2024 at 16:51 IST