बजाज कंपनीची Pulsar बाईक भारतीय भारतीय मोटरसायकलच्या बाजारात चांगलीच लोकप्रिय आहे. आता बजाज कंपनीने Pulsar NS125 ही नवी बाईक पोलंडमध्ये लॉन्च केली आहे. पुढील वर्षापर्यंत ही बाईक भारतीय बाजारात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलंडच्या चलनानुसार कंपनीने या बाईकची किंमत 7,999 Polish złoty म्हणजे जवळपास 1.59 लाख रुपये इतकी ठेवली आहे. मात्र, भारतीय बाजारात आल्यानंतर या भारतीयांसाठी या बाईकची किंमत 60 हजार रुपयांच्या जवळपास असू शकते. भारतीय बाजारात होंडा सीबी शाईन आणि हिरो ग्लॅमर या गाड्यांकडून Pulsar NS125 ला टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माध्यमांतील वृत्तानुसार भारतात आधीपासूनच असलेल्या Pulsar 135 LS या गाडीची जागा Pulsar NS125 घेणार आहे. नव्या पल्सर 145 प्रमाणेच दिसणाऱ्या या बाईकमध्ये डबल सीट सेट-अप देण्यात आला आहे. 125cc Pulsarमध्ये फ्यूल इंजेक्शन आणि सीबीएस आहे. 5 गिअरबॉक्स असलेल्या या बाईकमध्ये सिंगल-सिलिंडर, 4-वॉल्व, फ्यूल इंजेक्टेड, एअर-कूल्ड, DTS-i 124.4cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 12hp ची पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करतं. कंपनीच्या एनएस मॉडल्सप्रमाणे यामध्येही बेली पॅन आहे। एनएस 125 मध्ये पल्सर एनएस 160 आणि एनएस 200 प्रमाणे मॅट कलर स्कीम असेल. बाईकच्या पुढील बाजूला 240mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. ब्रेक अधिक सुरक्षित व्हावे यासाठी बाईकमध्ये CBS (कंबाइंड ब्रेकिंग सिस्टीम) आहे.