पुण्यातल्या चितळे बंधूंचे दुपारचे बंद दुकान हा पुण्याबद्दल बोलताना कायमच चेष्टेचा विषय असल्याचे पहायला मिळतं. मात्र २०१७ च्या सुरुवातीलच  ‘चितळे बंधू’ यांनी दुपारी एक ते चार दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही आजही अनेकदा चितळे बंधूंना यावरुन ट्रोल केलं जातं. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चितळे बंधू चर्तेत असण्याचं कारण वेगळचं आहे. चितळे बंधूंच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. वाक्य अगदी सोप्प आहे. चितळे बंधूंनी ट्विटरवर केवळ ‘ते बाकरवडी आहे भाकरवडी नाही!’ एवढचं पोस्ट केलं आहे. य़ावरुन आता नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु असून जिभेचे चोचले पुरवणाऱ्या बाकरवडीच्या नावावरुन तुफान चर्चासत्रच या ट्विटखाली भरल्याचे चित्र दिसत आहे.

चितळेंच्या या ट्विटवर पहिला रिप्लाय आहे पुणेकर असणाऱ्या अमित परांजपे यांचा. ‘या संदर्भात खुलासा केल्याबद्दल धन्यवाद’, असं परांजपे यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “माझ्याकडे ‘चितळे बंधूं’वर जोक आहे पण…”; ट्रोल करणाऱ्याला चितळेंकडून ‘पुणेरी टोमणा’, म्हणाले…

त्यानंतर काहींनी गुजरातमध्ये या पदार्थाला भाकरवडीच म्हणतात असं सांगितलं आहे. या ट्विटवर अनेक गुजराती लोकांनी रिप्लाय करुन आमच्याकडे याला भाकरवडीच म्हणतात असं स्पष्ट केलं आहे.

गुजराती मात्र…

गुजरातीत असं लिहिलेलं असतं

मराठीत आणि गुजरातीत असो मला आवडतात

हा घ्या गुजराती पुरावा

तुमचं तुम्ही आमचं आम्ही

संपूर्ण रिप्लायच गुजरातीमधून

अनेकांनी या गोष्टीबद्दल आपल्याला पहिल्यांदाच समजले, बाकरवडी म्हणतात हे समजण्यासाठी पुणेकर असावे लागते, पुणे सोडून सारं जग भाकरवडीच म्हणत, मला हे ठाऊकच नव्हतं, बरं स्पेलिंगमध्ये एच टाकल्याने किंवा न टाकल्याने चवीत काही फरक पडतो का?, पोटात गेल्यावर बाकरवडी काय आणि भाकरवडी काय असे अनेक मजेदार रिप्लाय दिलेत.

गब्बरला जब्बर रिप्लाय

गंमतीने घ्या

मी कधीपासून हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय

एचचा अभाव

नावाची फोड

गावाचं नाव

पुणेकर आणि इतर

अखेर तुम्ही उत्तर दिलं

पुणेकर उच्चांरांबद्दल खूपच काळजी घेतात

चुकीचं नाव घेणाऱ्यांना विकूच नका

याची गरज होती

धन्यवाद स्पष्टीकरणासाठी

हेच समजवण्यात सारं आयुष्य गेलं

एवढी काळजी पुणेकरांनाच असते

मी एवढा दिवस चुकतच होतो

सगळे घाटमाथ्याचे…

क्लास पण सुरु केले का?

बाकरवडी म्हणजे…

त्यांना वेगळ्या रांगेत उभं करा

मला कळत नाही…

चव महत्वाची

मला तर असा राग येतो

अंगावर काटाच येतो

मराठीत लिहीताना…

त्यासाठी…

सध्या चितळेंचं हे ट्विट व्हायरल झालं असून त्यांनी आपल्या प्रोफाइलवरही हे ट्विट पीन ट्विट म्हणजेच वर दिसत राहणारे ट्विट म्हणून ठेवलं आहे.