सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असतात. विशेषतः सिंह आणि चित्तासारख्या खतरनाक प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ पाहण्यात लोकांना जास्त रस असतो. असे शिकारीचे व्हिडीओ हे पाहण्याजोगे असतात. गिधाड हा असा प्राणी आहे ज्याची नजर अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे अतिशय उंचावरूनही ते आपले खाद्य सहज शोधतात. पण तुम्ही कधी गिधाडा स्विमिंग करताना कधी पाहिलंय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओमध्ये एक गिधाड अगदी माणसाप्रमाणे पाण्यात पोहताना दिसून येतोय. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित होऊ लागलेत. या व्हिडीओच्या शेवटी मात्र मोठा ट्विस्ट असल्यामुळे लोकांमध्ये हा व्हिडीओसाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा ट्विस्ट नेमका काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर मग हा व्हिडीओ तुम्हाला एकदा सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत पाहावं लागेल.
आणखी वाचा : चित्ता शिकारीसाठी आला असताना हरणाने अशी उडी घेतली की…, पाहा हा VIRAL VIDEO
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अगदी माणूस जसा आपल्या दोन्ही हातांचा वापर करत पोहत असतात, अगदी तसंच हे गिधाड आपल्या दोन्ही पंखांचा वापर करून पाण्यात पोहताना दिसून येत आहे. या गिधाडाच्या स्विमिंगच्या पुढे एखादा स्विमिंग चॅम्पियन देखील फेल ठरेल. आपल्या स्विमिंगचे कौशल्य वापरून हे गिधाड नदीत पुढे पुढे सरकताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, जर गिधाडाला उंच भरारी घेऊन आकाशात उडता येत असलं तरी हे गिधाड पाण्यात पोहून का बरं प्रवास करत असेल? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या व्हिडीओच्या शेवटी दाखवलेल्या एका ट्विस्टमध्ये आहे. जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
आणखी वाचा : ना लाल माती, ना फड, पण या दोन उंदरांची कुस्ती जबरदस्त, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : तुम्ही कधी इच्छाधारी नागिन पाहिलीय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
तुम्ही जर पूर्ण व्हिडीओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, हे गिधाड माणसाप्रमाणे नदीत का पोहत आहे. हे गिधाड नदीतल्या माशांची शिकार करण्यासाठी उतरलं आहे. आपल्या पंजामध्ये माश्यांना पकडत हे गिधाड नदीत पोहत आहे. पण त्याने पकडलेल्या माशाचं वजन जास्त असल्यामुळे हे गिधाड आपल्या पंखांचा वापर करत माणसासारखं पोहताना दिसून येत आहे. या गिधाडाने बराच वेळ नदीत स्विमिंग करून प्रवास केल्याचं दिसून येत आहे.
गिधाडाचा हा अनोखा व्हिडीओ unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ‘यापूर्वी तुम्ही कधी गिधाडाला पोहताना पाहिलंय का’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट्स सेक्शनमध्ये आश्चर्याची भावना व्यक्त केली आहे.