Balenciaga Torn Shoes : फ्रान्समधील बेलेंसियागा ही लक्झरी फॅशन कंपनी सध्या एका विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. तर हे विचित्र कारण आहे त्यांनी नुकतेच बाजारात आणलेली पॅरिस स्निकर्स नावाची बुटांची सिरीज. मात्र आता लक्झरी कंपनीचे अनेक शूज बाजारात येतात मग यामध्ये काय वेगळं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या बुटांबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅरिस स्निकर्स या नव्या रेंजमध्ये १०० बुटांचे लिमिटेड एडिशन जोड विकले जाणार आहेत. हे एक्ट्रा डिस्ट्रॉइड स्निकर्स असणार आहेत. म्हणजेच थेट शब्दश: अर्थ घ्यायचा झाला तर उद्ध्वस्त झालेले बूट असं या स्निकर्सला म्हणता येईल. हे नवे कोरे बूट खराब झालेल्या बुटांप्रमाणे दिसणारे आहेत. या बुटांची किंमत ६२५ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ४८ हजारांपासून सुरु होते. या लिमिटेड एडीशन बुटांची सर्वात महाग जोडी १ हजार ८५० डॉलर्स म्हणजेच १ लाख ४४ हजारांच्या आसपास आहे. यासंदर्भात कंपनीने जारी केलेल्या पत्रकारमध्ये हे बूट, “फार वापरलेले आणि खराब झाल्याप्रमाणे” आहेत असं म्हटलंय.

“या बुटांची डिझाइन ही क्लासिक असून त्यामध्ये मध्यम युगीन शैलीचा प्रभाव आहे. यात टाइमलेस कॅज्युअल लूकचे काळे, पांढरे, लाल तसेच रबरचा तळवा आणि टाचा असणारे बूट आहेत. हे बूट डिस्ट्रेस कॅनव्हासपासून तायर करण्यात आले असून त्यांची डिझाइन मळलेल्या बुटांप्रमाणे आहे. त्यामुळेच हे बूट आधी वापरल्यासारखे वाटतात,” असं कंपनीने म्हटलंय.

अर्थात आता या बुटांचे फोटो आणि त्याबद्दलची माहिती ऐकून नेटकऱ्यांना या बुटांची किंमत इतकी का आहे असा प्रश्न पडलाय. अनेकांनी तर या नव्या रेंजच्या बुटांची खिल्ली उडवली आहे. हे बूट एखाद्या पुरातन साईटवरुन उत्खनन करुन काढलेत की काय असा प्रश्न एकाने विचारलाय. तर एकाने ६००-७०० चे बूट घ्या आणि चिखलात खराब करुन या कशाला एवढा पैसा खर्च करायचा असा सल्ला दिलाय.

इन्स्टाग्रामच नाही ट्विटवरही या कंपनीला ट्रोल करण्यात आलं आहे. पाहूयात काही ट्विट…

कोणी का विकत घेईल हे शूज?

आगीत जाळलेले वगैरे की काय?

हे थक्क करणारं आहे…

कसलाही उद्योग करतात…

स्वस्तातले घ्या आणि…

हे माझ्या आईने फेकलेले बूट आहेत

दरम्यान, बेलेंसियागाचे हे बूट जगभरामध्ये त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून लवकरच विक्रीस उपलब्ध होणार असून युरोपीयन देशांमध्ये ९ मे पासून तर अमेरिकेत १६ मे पासून यांची विक्री सुरु होणार आहे.