स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलियाच्या सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटीत चेंडूला छेडछाड केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं सीएने म्हटलं आहे. पण दुसरीकडे, स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने काढून टाका असा आदेश ऑस्ट्रेलियाच्या सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी ही घटना आश्चर्यजनक आणि निराश करणारी म्हटलंय. सकाळी सकाळी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या वृत्तांमुळे आम्ही सर्वच निराश झालो, आमचा संघाचा एखाद्या खोटारडेपणामध्ये समावेश असेल या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. संपूर्ण देशासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. या संदर्भात मॅल्कम टर्नबुल यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांसोबतही चर्चा केली असून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या या कृतीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स कमिशनने कर्णधारासह संपूर्ण संघाविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा चेंडू एका पिवळसर वस्तूशी घासत असल्याचे टेलिव्हिजन चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मीडियासमोर चेंडूशी छेडछाड चुकीने नाही तर रणनितीचाच भाग होता असं मान्य केलंय. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा चांगलीच डागाळली असून क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर टीकेचा भडीमार होत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील ४३व्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचे पंचांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्याला रोखले. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. चेंडूला स्विंग मिळावा, यासाठी त्याच्याकडून चेंडूला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे, चेंडू खेळपट्टीवर आदळून त्याला स्विंग मिळू शकत होता, सांगण्यात येते.