Viral Video Today: भारतातील विविध कलाप्रकारांचा अंश हा काही पाश्चिमात्य नृत्य प्रकारांमध्ये सुद्धा दिसून येतो. आता उदाहरण द्यायचं तर कथ्थकमध्ये ज्या प्रकारे गोल गिरकी घेतली जाते तशा मूव्ह्ज या आणखीन थोडे बदल करून बॅलेमध्ये सुद्धा केल्या जातात. याला आणखी थोडी पारंपरिक जोड दिली आणि थोडे लटके झटके मिसळले तर गरबा- दांडिया खेळताना सुद्धा असं कर्तब केलं जातं. असाच एक भन्नाट कलाकार गिरकी घेऊन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्यक्तीचा वेग पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
giorgitatulashvil असे या कलाकाराचे नाव असून त्याच्या खाजगी अकाउंटवरून हा व्हिडीओ सर्वात आधी शेअर करण्यात आला होता ज्यावर लाखभराच्या वर व्ह्यूज व लाईक्स आहेत. प्रोफाइलवरून आपण अंदाज लावू शकतो की हा कलाकार एक बॅले डान्सर आहे. त्याच्या अकाउंटवरील अनेक रील्समध्ये त्याने आपल्या नृत्याची झलक दाखवली आहे. पण त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याचा वेग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतुलन पाहून भलेभले चकित होतील. तुम्ही नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक गिरकीच्या वेळी त्याचे पाऊल अगदी अलगद जमिनीला केवळ स्पर्श करत आहे. आणि त्याचा वेग तर इतका जबरदस्त आहे की त्यात तो चक्क हवेतच गिरकी मारतोय असा भास होतोय.
Video: ३० सेकंदात पंख्याच्या वेगाने या कलाकाराने किती गिरक्या घेतल्या मोजा
हे ही वाचा<< समुद्रात वादळामुळे डॉल्फीन्सची चेंगराचेंगरी! थरकाप उडवणारा क्षण बघाच..समोर आलं पूर्ण सत्य
दरम्यान, अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून हा डान्सचा कोणता प्रकार आहे याविषयी विचारणा केली आहे. मूळ अकाउंट व्यतिरिक्त सुद्धा अनेक पेजेसवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर काहींनी कमेंट करून हा माणूस तर हेलिकॉप्टरच्या वेगाने फिरतोय. अजून गिरक्या घेतल्या तर फॅनच्या ऐवजी तुम्हालाच काम दिले जाईल अशाही मजेशीर कमेंट केल्या आहेत. याला गिरक्या घेताना बघून आम्हालाच चक्कर आली असेही काही जण म्हणत्यात. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला.