Balya dance on diva railway station Viral Video: नुकताच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’चा एकच जयघोष सुरू झाला. घरोघरी, गल्लोगल्ली, मोठ-मोठ्या मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आणि सुखकर्ता दु:खहर्ता म्हणत या सणाला सुरुवात झाली. असं असताना कधी ११ दिवस गेले कळलंच नाही. काल म्हणजेच १७ सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाला सगळ्या भक्तांनी निरोप दिला.

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जल्लोषाचं वातावरण जरा जास्तच पाहायला मिळतं. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवात आवर्जून कोकणात जातात. कोकणातील घरोघरी बाप्पा विराजमान झालेले असतात, त्यामुळे तिथलं वातावरण अत्यंत भक्तीमय असतं. आरती, पूजा तसेच भजन-कीर्तनामध्ये भाविक मग्न असतात.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…

हेही वाचा… विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO

कोकणातील एक लोकप्रिय नृत्य म्हणजे बाल्या डान्स. कोणताही सणवार असो, बाल्या डान्स आवर्जून केला जातो. कोकणात बाल्या डान्ससारखं दृश्य पाहणं अगदी सहज-सोप असतं; पण तुम्ही कधी मुंबईत, तेही रेल्वेस्थानकावर बाल्या डान्स पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची तुफान चर्चा होत आहे. या व्हिडीओत तीन तरुण मंडळी मुंबईतील रेल्वेस्थानकावर बाल्या डान्स करताना दिसतायत.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत मुंबईतील दिवा स्थानकावर काही तरुण मंडळी बाल्या डान्स करताना दिसतायत. ‘सण वर्षाचा हा गौरी-गणपती’ या गाण्यावर तिघं जण थिरकताना दिसतायत. मधोमध मोठा स्पीकर ठेऊन रेल्वेस्थानकावर तिघे जण अगदी आनंदात ठेका धरताना दिसतायत. यामुळे रेल्वेस्थानकावर आजूबाजूला गर्दी झालेलीदेखील पाहायला मिळतेय.

हा व्हिडीओ @utsav_kokancha911 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “सुख म्हणजे कोकणातील गणेशोत्सव बाल्या डान्स”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… काकांचा जबरदस्त डान्स! डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन काकांनी धरला ठेका, कोकणातील गणरायाच्या विसर्जनाचा VIDEO VIRAL

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे फक्त कोकणी माणूसच करू शकतात, खूपच छान भावांनो”, तर दुसऱ्याने “जबरदस्त” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “स्वर्गाहूनी सुंदर आपलं कोकण.”

दरम्यान, याआधी अनेकदा रेल्वेस्थानकावर अनेकांनी रील्स शूट केल्या आहेत आणि त्या व्हायरलदेखील झाल्या आहेत. परंतु, त्यातील अनेक रील्स अश्लील डान्स आणि थिल्लरपणा दाखवणाऱ्या होत्या, त्यामुळे ही लोककला सादर करणाऱ्या या रीलला नेटकऱ्यांचं सध्या भरभरून प्रेम मिळतंय.

Story img Loader