मान्सूनचे आगमन होताच ट्रेकर्सला वेध लागते ते गड, किल्ले आणि सुंदर धबधबे पाहण्याचे. पावसाळा सुरू झाला की सोशल मिडियावर अनेक सुंदर धबधबे आणि गड-किल्यांवरील व्हिडीओ पाहायला मिळतात. अशा वेळी प्रत्येकाला पावसात भिजण्याची इच्छा होते. त्यामुळे शनिवार -रविवारी किंवा सुट्टी टाकून पर्यटक आणि ट्रेकर्सचे गृप मोठ्या संख्येने विविध पर्यटन स्थळी भेट देतात पण नियोजना अभावी अशा ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. गेल्याच आठवड्यात लोहगडावर झालेल्या ट्रेकर्स गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुधसागर धबधबा येथील पर्यटक आणि ट्रेकर्सच्या गर्दीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोव्यातील मुख्य आकर्षण आहे दुधसागर धबधबा

गोव्याचे समुद्रकिनारे नेहमीच सर्वांचे आकर्षण ठरले आहेत पण पावसाळ्यात येथील मुख्य आकर्षण असतो येथील दुधसागर धबधबा. हिरव्यागार डोंगरांमध्ये उंचावरून कोसळणारे शुभ्र धबधबे पाहण्यासाठी निसर्गप्रेमी देशाच्या काना-कोपऱ्यातून येथे येतात. पावसाळी ट्रेकसाठी उत्तम पर्याय असलेला दुधसागर धबधबा हा गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेला आहे. भारतातील पाचव्या सर्वात उंच धबधब्याकडे जाणारी पायवाट तुम्हाला घनदाट जंगले, नाले आणि पश्चिम घाटातील खडकाळ प्रदेशातून भव्य दूधसागरकडे घेऊन जाते. पावसाचा जोर वाढला की, हा प्रसिद्ध धबधबा अत्यंत सुंदर दिसतो. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये या ट्रेकर्स आणि पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देतात. परंतू सध्या नियोजनाच्या अभावामुळे आणि पर्यटक आणि ट्रेकर्सच्या वाढत्या संख्येमुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान सध्या गोवा पर्यटन विभागाने दूधसागर धबधब्याकडे जाण्यास सध्या बंदी घातली आहे अशी माहिती मिळाली आहे.

दुधसागर धबधब्याकडे जाण्यास बंदी

इंस्टाग्रामवर gadvede_trekkers’s याअकांउटवरून पर्यटकांच्या गर्दीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी सांगितले की, ”सदर video हा स्थानिकांनी ट्रेकबद्दल योग्य ती माहिती लोकांनी कळावी म्हणून आमच्याबरोबर शेअर केला आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व ट्रेक आयोजकांनी आधीच आपले ट्रेक कॅन्सल केले आहेत. स्थानिकांनी सांगितल्यानुसार कर्नाटक तसेच गोव्यामधून अजूनही लोक तिकडे येतात तसेच वैयक्तिकपणे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. सध्या पाऊस जास्त असल्याने आणि शुन्य नियोजन असलेल्या गोवा पर्यटन विभागाने दूधसागर धबधबा चालु केलेला नाही.”

हेही वाचा – दिसतं तसं नसतं म्हणून…! बसमध्ये बसलेल्या व्यक्तीचं डोकं झालं गायब? व्हायरल फोटोचं सत्य जाणून तुम्हीही व्हाल थक्क

पर्यटकांची झाली गर्दी

तसेच द न्यु इंडियन एक्सप्रेसचे असिस्टंट एडिटर अमित उपाध्याय यांनी ट्विटरवर दुधसागर येथील पर्यटकांच्या गर्दीचा व्हिडीओ शेअर करत सांगितले की,”दुधसागर रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने ट्रेकर्सला प्रसिद्ध कॅस्केडकडे ( धबधब्याकडे) जाण्यापासून रोखण्यात आले. मुसळधार पाऊस आणि रेल्वे वाहतूकीमुळे धबधब्याकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.”

हेही वाचा – बाप रे! थेट मगरीच्या जबड्यातच टाकला व्यक्तीने हात अन् पुढच्या क्षणी…पाहा थरारक व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडओ रिट्विटर करत एकाने लिहिले की,”पावसाळ्यात पश्चिम घाट अप्रतिम असतो. पण सह्याद्रीतील हे ‘मान्सून टुरिझम’ हाताबाहेर जात आहे. गर्दी आणि इतर जोखमींमुळे सुरक्षेच्या मुख्य समस्या निर्माण होत आहेत. अधिकाऱ्यांनी वर्दळीच्या ठिकाणी (उदा. किल्ले, पुण्याजवळील तलाव) अधिक चांगले प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू करणे आवश्यक आहे.”

ट्रेकर्सला काढव्या लागल्या उठाबशा

तसेच उपाध्याय यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये, रेल्वे संरक्षण दलाद्वारे दुधसागर धबधब्याकडे जाणाऱ्या टेकर्सला उठाबशा काढायला लावल्या आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on going to dudhsagar waterfall created rush of tourists and as a punishment trekkers were made to do squats by rpf india snk