अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Bandra Family Swept Away By Tides: मागील काही दिवसात पावसामुळे अनेक दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहेत. कल्याण- डोंबिवलीच्या दरम्यान नाल्यात वाहून गेलेलं बाळ, मुंबईच्या चौपाटीवर समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेलेली महिला यामुळे निसर्गाचे रौद्र रूप दिसून आले आहे. अशातच काही व्हिडीओ अक्षरशः अंगावर काटा आणत आहेत. असाच एक व्हिडीओ लाइटहाऊस जर्नलिझमला वांद्रे येथील असल्याचा दावा करत शेअर केल्याचे आढळून आले. व्हिडिओमध्ये समुद्राच्या लाटांमुळे दोन जण समुद्रात वाहून गेल्याचे दिसत आहे.

काय होत आहे व्हायरल?

तित्तर यूजर Aashish Shukla ने व्हायरल व्हिडिओ आपल्या ट्विटर प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील व्हायरल दावा शेअर करत आहेत.

तपास

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आमची तपासणी सुरू केली. आम्हाला टूलमधून विविध कीफ्रेम मिळाल्या. त्यानंतर आम्ही कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च सुरू केला. यामुळे आम्हाला या घटनेबद्दल अनेक बातम्या सापडल्या. आम्हाला india.com वेबसाइटवर एक बातमी सापडली.

रिपोर्ट चे शीर्षक होते: ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावरील व्हिडिओमध्ये भारतीय कुटुंब वाहून गेलं; दोघांचा मृत्यू

https://www.india.com/news/india/viral-video-indian-man-children-swept-away-by-angry-waves-on-oman-beach-dramatic-video-caught-on-camera-5512276/

१४ जुलै २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, ओमानमधील समुद्रकिनाऱ्यावर एक माणूस आणि त्याची दोन मुले लाटांनी वाहून गेली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आम्हाला त्याच संदर्भात आणखी काही बातम्या देखील सापडल्या.

https://www.news18.com/news/india/watch-maharashtra-man-two-children-swept-away-by-strong-waves-at-oman-beach-5555863.html

वृत्तात म्हटले आहे: एका दुःखद घटनेत, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक ४२ वर्षीय व्यक्ती आणि त्याची दोन मुले ओमानमधील सलाह अल-मुगसेलच्या किनारपट्टीवरील जोरदार लाटांनी वाहून गेली.

व्हायरल व्हिडिओवरून घेतलेले फोटो या दोन्ही बातम्यांमध्ये वापरण्यात आले होते.

आम्हाला इंडिया टुडेच्या यूट्यूब चॅनेलवर एक वर्षापूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला.

हे ही वाचा<< नाल्यात वाहून गेलेले चार महिन्यांचे बाळ जिवंत सापडले? २४ तासांनी अखेरीस समोर येतेय ‘ही’ माहिती

निष्कर्ष: ओमानमधील समुद्रकिनाऱ्यावर एक माणूस आणि त्याची दोन मुले लाटांनी वाहून गेल्याचा व्हिडिओ वांद्रे, मुंबई येथील व्हिडिओ म्हणून शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandra family swept away by high tides due to mumbai heavy rains video thrills netizens watch exact moment reality check svs
Show comments