बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी शहर ठप्प झाले. मुसळधार पावसाने शहराला झोडपले आणि काही भागात पाणी साचले. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यालाही मुसळधार पावसामुळे फटका बसला आणि पावसाच्या पाण्याने पूर आला. ज्यामुळे प्रवाशांना विमानतळावर पोहोचणे कठीण झाले. वेळेत फ्लाइट पकडण्यासाठी लोकांनी भलताच जुगाड लावला. आणि याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर प्रवाशांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की त्यांना विमान उड्डाणे पकडण्यासाठी विमानतळावर ट्रॅक्टरची सवारी करणे भाग पडते. काही वापरकर्त्यांनी अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अधिकाऱ्यांच्या तयारी आणि नियोजनाबद्दल प्रश्न विचारले.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

“आश्चर्य वाटते की एवढ्या मोठ्या’ विमानतळावर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची योजना का आखत नाहीत?” एकाने व्हिडीओ रीपोस्ट करत कॅप्शन लिहले. तर काहींनी हा व्हिडीओ शेअर करत बाकीच्यांना सतर्क केले.

Story img Loader