Police Women Viral Video News सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे सतत व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ चांगले आहेत तर काही खूप वाईट आहेत. आजकाल कोणी काहीही केले तरी लोक त्याचा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर टाकतात. त्यातील काही व्हिडिओ काही वेळातच व्हायरल होतात. असेच पोलीसांचेही व्हिडीओ व्हायरल होतात. काही लोक कधी पोलिसांवर त्यांच्या कामाबद्दल टीका करतात तर काही लोक त्यांची प्रशंसा करतात. दरम्यान महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना आता पोलिसही सुरक्षित राहिले नाहीत अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलाने भररस्त्यात महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत अश्लील कृत्य केलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ एका महिला पोलिसांशी संबंधीत आहे. जिथे तिच्यासोबत एक विचित्र कृत्य घडलं.मुलाने पोलीस महिलेचे चुंबन घेतले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही पोलिस दिसत आहेत. ज्यामध्ये काही स्त्री-पुरुषही उभे असलेले दिसतात. व्हिडिओमध्ये आजूबाजूला लोकांची गर्दी दिसत आहे. यावेळी एक मुलगा महिला पोलिसासोबत उभा असल्याचे दिसत आहे. यानंतर मुलाने महिला पोलीस अधिकाऱ्याला मिठी मारली. पण त्यानंतर लगेचच या मुलानं महिला पोलिसाला किस करण्याचा प्रयत्न केला. पण महिला पोलिस थोडक्यात बचावली. यानंतर महिला पोलीस घाबरलेली दिसत आहे. मुलाच्या या कृतीने तिथे उभे असलेले लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है; भर लग्नात नवरदेवाच्या खिशातील नोटांवर मारला डल्ला

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “तो मुलगा स्वप्नात आहे की नाही हे तपासत आहे.” “फायदा कसा घ्यायचा हे कोणीतरी या मुलाकडून शिकले पाहिजे”, अशी टिप्पणी आणखी एका वापरकर्त्याने केली. दुसऱ्या युजरने कमेंट केली “हे धक्कादायक आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangla women police video boy hug her and try to kiss women police in front of camera video trending on social media srk