वारंवार सांगूनही लोक सर्रासपणे नियमभंग करताना दिसतात. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा लोक धोकादायक पद्धतीने प्रवास करताना दिसतात तर कोणी रेल्वे स्टेशनवर डान्स करताना दिसत असे. सेल्फी आणि व्हिडीओच्या नादात अनेकांनी जीव गमावल्याच्या अनेक घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तरीही लोक पुन्हा तीच चूक करतात. दरम्यान अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. बांगलादेशातील रेल्वे ट्रॅकवर टिकटॉकसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत असताना एका १४ वर्षांच्या मुलाला ट्रेनने धडक दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी घडली आहे. रंगपुरा येथे रेल्वेरुळावर लहान मुलांचा एक गट व्हिडिओ शुट करण्यात मग्न होता त्यांचे मागून येणाऱ्या ट्रेनकडे लक्ष नव्हते.

X वर मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसते की काही मुले रेल्वे ट्रॅकवर नाचत आणि पोज देताना मुले शुटिंग करत आहेत. अचानक, ग्रुप सेल्फीसाठी एकत्र येत असताना भरधाव वेगाने एक ट्रेन तिथे आली दरम्यान रेल्वे रुळाच्या अत्यंत जवळ असलेल्या मुलाला रेल्वेने जोरात धडक दिली. हा अपघाताचा नेमका क्षण व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्यात झाला होता. त्यानंतर त्याच्या मित्रांच्या चेहऱ्यावर भिती दिसत होती. झाल्या प्रकाराचा त्यांना चांगलाच धक्का बसला होता त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते.

हेही वाचा –“ग्राहक हेच आमचे दैवत हे सत्य आहे पण…”, हे फक्त पुण्यातील दुकानदार करू शकतात, पुणेरी पाटी चर्चेत, पाहा Viral Video

व्हिडीओमध्ये रेल्वेची धडक आणि त्यानंतर परिस्थिती ब्लर करण्यात आली आहे. या अपघातमध्ये जखमी झालेल्या मुलाचं नाव लखन असल्याचे समजते, अपघातानंतर त्याला तातडीने रंगपुरा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, तो सध्या न्युरोसर्जरी विभागात त्याच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत.

हेही वाचा –प्रेम करावं तर पुणेकरांसारखं! मालकीणबाईसाठी काहीपण, Video Viral एकदा बघाच

ही घटना असुरक्षित ठिकाणी व्हिडिओ शुट करणे किती धोकादायक ठरू शकते याची आठवण करून देणारी आहे