Bangladesh Triple Murder: लाइटहाऊस जर्नलिझमला X वर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जाणाऱ्या फोटोंचा एक कोलाज आढळून आला आहे. बांगलादेशात एका हिंदू कुटुंबाची हत्या झाल्याचा दावा करत हे फोटो शेअर करण्यात आले होते. दाव्याला जातीय अँगल देऊन शेअर केले जात आहे. तपासाअंती असे आढळून आले की पोस्ट दिशाभूल करणारी आहे आणि या प्रकरणातील आरोपी हा पीडित विकास सरकारचा भाचा रिजब भौमिक आहे. नेमकं हे प्रकरण काय व त्यातील तथ्य काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Rishant Choudhary ने व्हायरल पोस्ट आपल्या प्रोफाइल वर शेअर केली आहे.

फेसबुकवर आढळलेल्या पोस्टमध्ये अधिक तपशील देण्यात आले आहेत.

(हत्येचे फोटो संवेदनशील असल्याने इथे जोडलेले नाहीत)

तपास:

या घटनेबाबतचे वृत्त तपासून आम्ही आमचा तपास सुरू केला. पोस्टमध्ये ‘विकास सरकार आणि स्वर्ण राणी सरकार’ अशी नावे होती. त्यानंतर आम्ही या नावांवर गुगल सर्च केले. ‘स्वर्ण राणी सरकार’ या नावाचा वापर करून, आम्हाला thedailystar.net वर एक बातमी सापडली.

बातमीत नमूद केले आहे: पारोमिता सरकार तुशी (१५) आणि तिचे पालक विकास सरकार व स्वर्णा राणी सरकार या पीडितांचे मृतदेह मंगळवारी बाहेर काढण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेला, राजीव भौमिक (वय ३५) हा विकासचा पुतण्या आहे, ज्याने पैशाच्या वादातून ही हत्या केल्याचा दावा केला आहे.

आम्हाला observerbd.com वर एक बातमी देखील सापडली ज्याचे शीर्षक आहे: पुतण्याने संपूर्ण कुटुंब संपवले आहे

रेपोर मध्ये म्हटले आहे: राजीव कुमार भौमिकने त्याचा मामा बिकाश चंद्र सरकार, काकू स्वर्णा राणी सरकार आणि चुलत भाऊ तुशी सरकार यांची सिराजगंज जिल्ह्यातील तारश उपजिल्हा येथे हत्या केली होती. मामाने भाच्याकडे थकबाकीचे पैसे मागितल्याने हा वाद झाला असे सांगण्यात येत आहे. ३१ जानेवारी २०२४ रोजी हा अहवाल अपलोड करण्यात आले. आम्हाला बंगाली भाषेतील काही रिपोर्ट्स सुद्धा सापडले.

https://www.prothomalo.com/bangladesh/district/q04k4fdq1u
https://www.dhakatimes24.com/2024/01/31/341822
https://www.banglanews24.com/national/news/bd/1273234.details

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही बांगलादेशातील तौसिफ अकबर या फॅक्ट चेकरशी संपर्क साधला. या घटनेत कोणताही जातीय अँगल नसल्याची पुष्टी त्यांनी केली. हत्येतील आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असून ते एकाच धर्माचा होते असे तौसिफ़ नि सांगितले. तौसिफ़ नि आम्हाला एक विडिओ न्युज रिपोर्ट देखील पाठवला.

हे ही वाचा<< Budget 2024 मध्ये कर्मचारी वर्गासाठी खुशखबर? आठवड्यात ४ दिवस काम, ३ दिवस सुट्टी, पण सत्य काय?

निष्कर्ष: बांगलादेशमध्ये एका कुटुंबातील तीन सदस्यांची त्यांच्याच नातेवाईकाकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्या प्रकरणाला जातीय अँगल देऊन दिशाभूल करणारे दावे भारतात मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh triple murder hindu family one teenager killed real reason money or religion shocking crime incident going viral reality svs
Show comments