Bangladesh Violence Viral Video : भारताशी मैत्री असलेल्या, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील हिंसाचारानंतर देश सोडून पलायन करावे लागले. त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतात आश्रय घेतला आहे. यादरम्यान भारतात अनेक दिशाभूल करणारे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत; जे बांगलादेशातील परिस्थितीचे भयानक चित्र दाखवीत आहेत. व्हिडीओमध्ये दोन महिला खांबाला बांधलेल्या दिसत आहेत आणि त्यांना इतर महिला त्रास देत आहेत. या व्हिडीओमध्ये बांगलादेशातील हिंदू महिलांना काही मुस्लिम महिला त्रास देत आहेत, असा दावा करण्यात आला आहे. तपासादरम्यान आम्हाला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले आहे.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या एक्स (ट्विटर) @barkhatrehan16 युजरने हा व्हिडीओ शेअर केला. तसेच कॅप्शनमध्ये ‘बांगलादेशात मुस्लिम महिला, हिंदू महिलांबरोबर हे काय करीत आहेत? मला विचारायचे आहे की, जगभरातील स्त्रीवादी संघटना, यूएन गप्प का बसले आहेत?’ असे म्हटले आहे.
इतर वापरकर्तेदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही रिव्हर्स इमेज सर्च करून व्हिडीओसंबंधित आमचा तपास सुरू केला. त्यादरम्यान आम्हाला m.priyo.com या बांगलादेशी (Bangladesh) मीडिया वेबसाईटवरील एक बातमी सापडली. बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
लिंक… https://m.priyo.com/e/5253064-
या बातमीबद्दल अधिक तपास केल्यानंतर आम्हाला समजले की, ती बातमी १७ जुलै रोजी प्रकाशित झाली होती. त्यात म्हटले आहे की, राजधानी शहरातील बेगम बद्रुननेसा, सरकारी महिला महाविद्यालयात अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवले आहे. या प्रकरणी महिलांना अटक करण्यात आली आणि पीडित मुलींना नंतर सोडून देण्यात आले. ही घटना महाविद्यालयाच्या निवासी वसतिगृहात बुधवार, १७ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली.
आम्हाला बांगलादेशातील आणखी एक मीडिया आउटलेट jagonews24 वरील बातमीचा अहवालदेखील सापडला.
बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
लिंक… https://www.jagonews24.com/campus/news/956330
त्यानंतर आम्ही बांगलादेशातील (Bangladesh) वरिष्ठ तथ्य तपासक तन्वीर महताब अबीर यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला माहिती दिली की, ढाका येथील बक्षी बाजार येथील बेगम बद्रुननेसा यांचा सरकारी महिला महाविद्यालयात अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवल्याच्या घटनेचा हा व्हिडीओ जुना आहे आणि तो कोणताही जातीय मुद्दा नाही.
निष्कर्ष : विद्यार्थिनींना खांबाला बांधल्यासंबंधीचा तो व्हिडीओ बांगलादेशातील (Bangladesh) आहे, असे सांगून मुस्लिम महिला हिंदू महिलांना मारहाण करीत असल्याच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत हे सिद्ध होत आहे.