Video of Bangladesh went viral: बांगलादेशमधील अशांततेच्या दरम्यान, हजारो निदर्शक (आंदोलन करणारे) शेख हसीना यांच्या निवासस्थानावर धडकल्याचे आणि त्यांच्या घरातल्या वैयक्तिक वस्तू घेऊन जातानाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

लाइटहाऊस पत्रकारितेला अशीच एक पोस्ट सापडली, जिथे निदर्शक स्विमिंग पूलमध्ये आनंद लुटताना दिसले. या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, हे दृश्य माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानाचे आहे. परंतु, व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत, तसेच हा व्हिडीओ खूप जुना असून श्रीलंकेचा आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

हेही वाचा… सिलेंडरवर डान्स करताना घसरला पाय अन्…, महिलेचा VIRAL VIDEO पाहून काळजात भरेल धडकी

काय होत आहे व्हायरल? (Viral Video)

X युजर Hafiz Usama Abubakar ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.

या पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://archive.ph/FuKPi

इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

यामुळे आम्हाला द इंडिपेंडंट या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता.

व्हिडीओचे शीर्षक होते: Sri Lankan protesters swim in president’s pool after storming official residence

वर्णनात नमूद केले आहे : अनेक आंदोलकांनी अध्यक्षांच्या घरावर हल्ला केल्यावर त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली, तर काही जण त्यांच्या बाल्कनीत फिरत होते.

हेही वाचा… हिच्यापुढे तृप्ती डिमरी पण फेल; विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स, VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बसं कर, तू…”

CNN वरील एका लेखात याबद्दलचा व्हिडीओ आम्हाला सापडला.

https://edition.cnn.com/asia/live-news/sri-lanka-protests-07-09-22-intl/index.html

व्हिडीओमध्ये बीबीसीचा वॉटरमार्क असल्याने आम्ही बीबीसीचे सोशल मीडिया चॅनेल तपासले.

आम्हाला बीबीसीच्या वेबसाइटवर व्हिडीओ सापडला.

https://bbc.com/news/av/world-asia-62105698

वर्णनात नमूद केले आहे : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये हजारो निदर्शकांनी राष्ट्रपतींचे निवासस्थान ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये निदर्शक श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोतबया राजपक्षे यांच्या स्विमिंंग पूलमध्ये पोहताना दिसत आहेत. श्रीलंकेच्या आर्थिक संकटावर अनेक महिन्यांच्या निदर्शनांनंतर निदर्शक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा… विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; विद्यापीठात दोघांनी केलं किस अन्…, VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

निष्कर्ष : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये निदर्शकांनी राष्ट्रपतींचे निवासस्थान ताब्यात घेतले, तेव्हाचा श्रीलंकेचा जुना व्हिडीओ बांगलादेमधला सांगून व्हायरल होत आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

Story img Loader