Bangladeshi Actor Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत असलेला एक व्हिडीओ आढळून आला; ज्यामध्ये सायकल रिक्षातून जात असलेल्या एका परदेशी महिलेला काही तरुण भररहदारीच्या रस्त्यावर त्रास देताना दिसत आहेत. ही संतापजनक घटना भारतात घडली असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, तपासाअंती हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबतचे सत्य समोर आले, ते काय आहे जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर एजाज खानने त्याच्या प्रोफाईलवर व्हायरल दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील असाच दावा करीत हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.



तपास :
व्हिडीओवरून मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून, आम्ही तपास सुरू केला. आम्ही तपासादरम्यान व्हिडीओवरील टेक्स्ट काढून टाकला.
यावेळी आम्हाला १ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘टाइम्स नाऊ’च्या फेसबुक पेजवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की (भाषांतर) : अभिनेत्री मिष्टी सुबास आणि शेख हसीना यांच्या समर्थकाने बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा वाढदिवस केक कापून साजरा केल्याने लोकांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.
आम्हाला इतर अनेक प्लॅटफॉर्मवरदेखील हा व्हिडीओ सापडला. ‘जिस्ट न्यूज’नेही १ ऑक्टोबर २०२४ रोजी हा व्हिडीओ अपलोड केला होता.
आम्हाला या घटनेबाबत बातम्याही मिळाल्या.
https://www.abplive.com/trending/bangladeshi-actress-mishti-subas-was-harassed-for-celebrating-sheikh-hasina-birthday-and-cutting-the-cake-2795036
निष्कर्ष :
माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री मिष्टी सुबास बांगलादेशच्या रस्त्यावर गेल्या असता, त्यांची काही तरुणांनी छेड काढली. या घटनेचा जुना व्हिडीओ भारतातील अलीकडचा असल्याचे सांगून शेअर केला जात आहे. त्यात एका अमेरिकन महिलेचा भारतात छळ होत असल्याचा खोटा दावा करीत, व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे. हा व्हिडीओ बांगलादेशातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.