बांगलादेशमधील एका मुस्लीम धर्मगुरुने फेसबुकवरील हाहा इमोजीविरोधात फताव काढला आहे. सोशल नेटवर्किंगवर प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या या धर्मगुरुने फेसबुकवर लोकांची खिल्ली उडवण्यासाठी इमोजी वापरला जात असल्याचं कारण दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“सध्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकजण हे फेसबुकवरील हाहा इमोजीचा लोकांची खिल्ली उडवण्यासाठी वापर करतात,” असं या व्हिडीओमध्ये अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. “जर आपण एखाद्या व्यक्तीने पोस्ट केलेल्या मजेदार कंटेटंवर हा इमोजी वापरला आणि तो मजकूर खरोखरच विनोदी असेल तर हरकत नाही. मात्र तुम्ही एखाद्या व्यक्तीची खिल्ली उडवण्यासाठी त्याला बदनाम करण्यासाठी हाहा इमोजी वापरत असाल किंवा कमेंट करत असला तर हे इस्मामनुसार पूर्णपणे चुकीचं आहे. देवाचं नाव घेऊन मी तुम्हाला विनंती करतो की असं करुन नका. एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी हाहा इमोजी वापरुन नका. तुम्ही एखाद्या मुस्लीम व्यक्तीला दुखावलं तर तो वाईट भाषा वापरुन तुम्हाला उत्तर देऊ शकतो,” असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
नक्की पाहा >> Photos: अबब… काही किलोमीटरपर्यंत पसलं आहे हे कोळ्यांचं जाळं; जाणून घ्या नक्की काय घडलंय
या व्हिडीओवर हजारो जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हा मुद्दा पटला असला तरी बऱ्याच जणांनी या व्हिडीओवरही हाहा इमोजी वापरुन प्रतिक्रिया दिलीय. अब्दुल्ला हे बांगलादेशमधील तरुण धर्मगुरुंपैकी एक असून त्यांची सोशल नेटवर्किंगवर खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. सामाजिक विषय आणि धार्मिक विषयांवर त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात आणि लाखो लोकं ते पाहतात.