हैदराबादमधील ८५ वर्षीय व्यक्तीला बँकेचा निष्काळजीपणाचा मोठा फटका बसला. १८ तास ८५ वर्षीय व्ही कृष्णा रेड्डी बँकेत अडकले होते. सोमवारी संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी ते बँकेत गेले होते आणि त्यांची सुटका मंगळवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी करण्यात आली. पोलीस बँकेत पोहोचले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटनेच्या दिवशी, ज्युबली हिल्स रोड क्रमांक ६७ मध्ये राहणारे रेड्डी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पॉश बंजारा हिल्स भागातील युनियन बँकेच्या शाखेत लॉकरमधून काही मालमत्ता घेण्यासाठी गेले होते. पडताळणीनंतर त्याला लॉकर रूममध्ये पाठवण्यात आले. बँक बंद होण्याची वेळ आली होती आणि बँक सुरक्षा कर्मचार्‍यांना लॉकरच्या आत ते दिसले नाहीत. ते बँक बंद करून रात्री निघून गेले. यानंतर रेड्डी घरी परतले नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी शोधाशोध केली आणि अखेर पोलिसात तक्रार दिली. रेड्डी फोन घरी विसरून गेले होते. त्यामुळे पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवली आणि बँकेच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, संबंधित व्यक्ती बँकेच्या आत अडकली आहे. पोलीस मंगळवारी सकाळी बँकेत गेले आणि त्यांनी लॉकर रुम खोलण्यास सांगितली. तेव्हा तिथे रेड्डी बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले.

Shocking Video: दिल्लीत स्पाइसजेटचे विमान खांबाला धडकलं, सुदैवाने अपघात टळला

ज्युबली हिल्सच्या एसएचओने ट्विट केले की, “आम्ही जुबली हिल्समधील वृद्ध व्यक्तीचा शोध घेतला आहे. संध्याकाळी चुकून युनियन बँकेच्या लॉकर रूममध्ये बंद झाले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केल्यानंतर त्याला यशस्वीरित्या वाचवले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank negligence an 85 year old man was locked for 18 hours rmt