अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अमेरिकन जनतेच्या मनावर राज्य करण्यास यशस्वी झाले. अमेरिकेचे पहिले अश्वेत राष्ट्राध्य होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला असला तरी अनेकांसाठी आजही ते लाडके राष्ट्राध्यक्ष आहे. मिशेल आणि बराक यांची जोडी तर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.
वाचा : अबुधाबीच्या युवराजांचं आलिशान विमान!
आपल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात या दोघांनी व्हाईट हॉऊसमध्ये जो काळ व्यतीत केला आहे त्यावर लवकरच पुस्तक प्रकाशित होणार असून पेग्विंन प्रकाशनाने यासाठी जवळपास ४ अब्ज रुपयांचा करार केला असल्याचे बोलले जात आहे. ओबामा दाम्पत्यांना व्हाईट हाऊसमध्ये घालवलेल्या क्षणांवर एक पुस्तक लिहायचे आहे. असा मानसही त्यांनी बोलून दाखवला आहे आणि यासाठी जगातील सगळ्यात मोठी प्रकाशक कंपनी पेंग्विनने अब्जावधीची रक्कम देऊ केल्याचे बोलले जात आहे. याबद्दल सध्या तरी अधिकृत घोषणा केली गेली नाही, पण लवकरच याची अधिकृत घोषणा होईल. ओबामा यांनी याआधी ‘ड्रीम्स फ्रॉम माइ फादर’, ‘दी ऑडेसिटी ऑफ होप’ आणि‘ऑफ दी आई सिंग’ अशी तीन पुस्तक लिहिली होती. ज्याच्या लाखो प्रती जगभर खपल्या गेल्या.
वाचा : मुलीला परत मिळवण्यासाठी डच आईचे स्वराज यांना साकडे
यावेळी व्हाईट हाऊसमधल्या अनुभवावर हटके शैलीत त्यांना पुस्तक लिहायचे आहे. याआधी बिल क्लिटंन आणि जॉर्ज बुश यांनीही व्हाईट हाऊसच्या आठवणींबद्दल पुस्तक लिहिले होते.