अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Barbie Movie: नुकताच प्रदर्शित झालेला बार्बी चित्रपट जगभरात चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे. या चित्रपटावर व्हिएतनाममध्ये बंदी घालण्यात आली होती तर सामान्य प्रेक्षकही सिनेमातील काही भागांवरून आक्षेप घेत आहेत. दुसरीकडे वॉर्नर ब्रदर्सने सुद्धा अनेक आरोप धुडकावून लावले आहेत. या भांडणात लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया वेबसाइट्सवर एक कमाल फोटो व्हायरल होत असल्याचे आढळून आले. या फोटोमध्ये डेमोक्रॅट अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि जो बिडेन हे बार्बी चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने गुलाबी सूट घालून पोज देताना दिसत आहेत.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Jon Cooper ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील ट्विटर आणि फेसबुकवर हे फोटो शेअर करत आहेत.

हेही पाहा- मुसळधार पावसाने माणसांना आणि हरणांना एकाच छताखाली आणलं, व्हायरल होणारा मनमोहक व्हिडिओ एकदा पाहाच

तपास:

व्हायरल झालेल्या फोटोचे बारकाईने निरीक्षण करून आम्ही आमचा तपास सुरू केला. जो बिडेन अतिशय वास्तववादी दिसत असले तरी बराक ओबामा यांचे चित्र थोडे संशयास्पद वाटले.

आम्ही हा फोटो ‘ऑप्टिक एआय ऑर नॉट’, एआय जनरेट केलेल्या इमेज डिटेक्टर मध्ये तपासले असता हा फोटो AI तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आल्याचे सिद्ध झाले.

त्यानंतर आम्ही हे फोटो जो बिडेन, बराक ओबामा यांच्या सोशल मीडिया पेजवर तपासले. आम्हाला त्यांच्या प्रोफाइलवर हे फोटो सापडले नाहीत.

तसेच इतर कोणत्याही वृत्त प्रसारमाध्यमांनी जो किंवा ओबामा यांचा गुलाबी रंगाचा सूट परिधान केल्याचे फोटो किंवा बातम्या प्रसारित केल्या नाहीत.

यानंतर जॉन कूपरने ट्विटवर उत्तर देत सांगितले की हा फोटो खरा नाही.

निष्कर्ष: बार्बी चित्रपट रिलीज झाल्याच्या आनंदात बराक ओबामा आणि जो बिडेन यांनी गुलाबी पोशाख घातले नव्हते. व्हायरल फोटो AI वापरून बनवण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barak obama joe biden poses in bright pink suits to celebrate barbie these viral images tells different story reality is here svs
First published on: 27-07-2023 at 17:08 IST