सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ असे असतात की ते पाहून आपणाला हसू आवरण कठीण होत. शिवाय ते व्हिडीओ पुन्हापुन्हा पाहण्याचा आणि इतरांना पाठवण्याचा मोह आपणाला आवरता येत नाही इतके मजेशीर ते व्हिडीओ असतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा पोट धरुन हसायला लावणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला असता चक्क रडायला सुरुवात करतो. तो सलूनमधील खुर्चीवर बसतो आणि केस कापणारा मुलगा त्याचे केस कापत असताना एक गाणं वाजतं, ते ऐकून तो ढसाढसा रडायला सुरुवात करतो.
हेही पाहा- आई ती आईच! पिल्लांची शिकार करायला आलेल्या पक्ष्याशी प्राण पणाला लावून लढली अन् शेवटी…
गाणं वाजताच रडायला केली सुरुवात-
सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओमधील व्यक्ती केस कापण्यासाठी सलूनमध्ये जातो आणि एका खुर्चीवर बसतो. यावेळी एक मुलगा त्या व्यक्तीचे केस कापायला सुरुवात करतो. त्याचवेळी सलूनमध्ये हिंदी सिनेमातील ‘उम्र भर सोना सकेगे किसी के होना सकेंगे, किसी बेगाने की खातिर तुमने अपनों को भुला दिया’ हे गाणं कोणीतरी लावतं आणि ते गाणं ऐकून तो माणूस ढसाढसा रडायला सुरुवात करतो.
या माणसाला रडाताना पाहून केस कापणाऱ्या मुलालाही हसू आवरता येत नाही. रडणारा माणूस टॉवेलने डोळ्यातील पाणी पुसताना दिसतं आहे. शिवाय तो इतका रडतोय की त्याचे हात आणि ओठ थरथरत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हे गाणं ऐकून त्याला त्याच्या प्रेयसीची आठवण आल्यामुळे तो रडायला लागल्याचं अनेकजण म्हणत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ कधी आणि कुठे व्हायरल झाला याबाबतची माहिती मिळाली नाही. मात्र, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने ‘या रडणाऱ्या व्यक्तीने मनापासून प्रेम केलं असणार त्यामुळेच तो रडत असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने भावाच्या जुन्या जखमा ताज्या झाल्याच म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने, ‘त्याच्या मनातील वेदना त्यालाच माहिती असणार.’ अशी कमेंट केली आहे.