आपला चेहरा हा आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. कारण त्यामुळेच आपली ओळख ठरत असते. त्यामुळे ही ओळख जपणे आणि ती अधिक वृद्धिंगत करणे फार गरजेचे असते. चेहऱ्याची काळजी घेणे आणि तो अधिकाधिक चांगला दिसावा, यासाठी प्रयत्न करणे यात काहीही गैर नाहीये. त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस मसाज केल्याने तुमच्या त्वचेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. फेस मसाज करण्यासाठी बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या क्रीमचा वापर केला जातो. परंतु, फेस मसाज करण्यासाठी केस कापणार्‍याने चक्क आपल्या थुंकीचा वापर केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटिझन्सने संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी लोक डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल करतात, तर कधी भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत असतो. तर कधी अश्लील कृत्य करतानाचे व्हिडीओ, स्टंट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु, आता असा व्हिडीओ समोर आला, जे पाहून तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे. नेमकं काय घडलं याबद्दल जाणून घेऊया…

(हे ही वाचा : कंगना रणौतला लगावली कानशिलात, आणखी एका महिलेवरही हात उगारला; घटनेचा व्हिडिओ आला समोर )

प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शामली येथील थानाभवन परिसरातील मालिश करताना केस कापणार्‍याने थुंकीने एका तरुणाचा फेस मसाज करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. खरंतर सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये, केस कापणार्‍याने एका तरुणाच्या चेहऱ्यावर मालिश करताना दिसत आहे. हेच नाही तर मालिश करताना तो केस कापणार्‍याने आधी आपल्या हातावर थुंकतो आणि आपली थूंक त्या तरुणाच्या चेहऱ्यावर लावून मसाज करताना या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुसरीकडे जेव्हा व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर एसपी अभिषेक यांनी सतीश कुमार यांना चौकशी व कारवाई करण्याचे निर्देश दिले. व्हिडीओच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ प्रसारित करणार्‍या व्यक्तीने केस कापणार्‍यानाचे नाव अमजाद म्हटले आहे. एएसपी संतोष कुमार सिंग म्हणाले की, चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल. तीन वर्षांपूर्वी, शामली कोटवली येथील फाउंटेन चौकाजवळ ओव्हनवर थुंकण्याचा व्हिडीओ प्रसारित केला गेला होता, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barber spitting on face of man during massage in shamli video viral pdb
Show comments