भारत हा एक देश आहे जो काळासोबत प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतो, भारत अशा विकसनशील देशांपैकी एक आहे, जो सर्वात जास्त प्रगतीच्या पायऱ्या चढत आहे. आपल्या सर्वांना आपला भारतीय असल्याचा अभिमान आहे. सर्वात जुनी सभ्यता आणि प्राचीन संस्कृतीने समृद्ध भारताचा इतिहास अभिमानास्पद आहे. भारत हा विविधतेने नटलेला आणि परंपरा लाभलेला महान देश आहे. विवधता असूनही भारतात एकता आहे. भारतात बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी तुम्ही एकल्या असतील, मात्र आजही अशा बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीयेत. त्यापैकीच एक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आपल्या देशात असं एक गाव आहे जिथे फक्त एकच घर असून एकच कुटुंब राहतं. हे वाचून तुम्ही म्हणाल असं कसं? मात्र ही गोष्ट खरी असून यामागे नेमकं काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.
१ कुटुंब आणि ५ सदस्य
गावं म्हंटलं की पहिलं डोळ्यासमोर येतं ते गावातील लोकं, कुटुंब, पुढारी, शेतकरी मात्र भारतात एक असं गाव आहे जिथे फक्त एकच घर आणि त्यात एकच कुटुंब राहतं. या गावाचं नाव बर्धनारा क्रमांक २ आहे. याच नावाचं आणखी एक गाव आहे ज्याचे नाव बर्धनारा क्रमांक १ असं आहे. हे गाव आसामच्या नलबारी जिल्ह्यात येते. अनेक वर्षांपूर्वी आसामच्या एका मुख्यमंत्र्यांनी गावात रस्त्याचे उद्घाटन केले होते, पण आता तो रस्ता तुटला आहे. गावाला मुख्य शहराशी जोडणारा हा एकमेव रस्ता होता. मात्र आता केवळ कच्चा रस्ताच अस्तित्वात आहे.
हेही वाचा >> Hotel Bademiya: मुंबईतील प्रसिद्ध ‘बडेमिया हॉटेल’ला टाळं; किचनमध्ये आढळले झुरळ अन् उंदीर
पण असं का?
अनेक वर्षांपूर्वी या गावातही अनेक कुटुंब आणि अनेक लोक राहत होती. मात्र २०११ ला झालेल्या जनगणनेनुसार बर्धनारा गावात फक्त १६ लोक उरले होते. मात्र आता ही संख्या आणखी कमी झाली आहे. NDTV च्या वृत्तानुसार, आता या गावात फक्त १कुटुंब राहते ज्यात ५ सदस्य आहेत. येथे रस्ते नसल्याने लोक येथून निघून जातात आणि पावसाळ्याच्या दिवसात लोकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. आजही या गावात राहणाऱ्या कुटुंबाला पावसाळ्याच्या दिवसात होडीच्या साहाय्याने प्रवास करावा लागतो. बिमल डेका असे कुटुंबप्रमुखाचे नाव असून, त्यांची पत्नी अनिमा आणि त्यांची तीन मुले नरेन, दिपाली आणि सियुती या गावात राहतात.