Viral video: लग्नातील अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर अलिकडे बरेच व्हायरल होत आहेत. यात काही विचित्र घटना बघायला मिळतात तर काही घटना अशा असतात ज्या विचार करायला भाग पाडतात. हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या लेकीची पाठवणी तिचे आईवडील वाजत गाजत करतात. तिच्या लग्नात तिला हवं-नको ते सारं पाहतात. तिच्या त्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालतात. लेकीचा संसार चांगला व्हावा, फुलावा याकरता तिचे आई-वडील हवं ते सारं काही करतात. पण एवढं करूनही मुलगी सासरी नांदली नाही तर? मुलीनं रडत-खडत का होईना सासरी नांदावं, तिचं एकदा लग्न लावून दिलं की तिने परतीची वाट धरू नये म्हणून पालक देव पाण्यात घालून ठेवतात. पण सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये नवरीनं नवरदेव दारु पिऊन आल्यामुळे लग्न मोडलंय.

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नवरीच्या या निर्णयाचं अनेकांना आश्चर्य वाटत असलं तरीही हे पाऊल स्वागतार्ह म्हणावं लागेल. कारण, मुलीने दुःखात संसार करण्यापेक्षा सुखात माहेरी राहावं, हा विचार मनात येण्यासाठी समाजातील चौकटींना मोडीत काढण्याची धमक आई-वडिलांमध्ये असावी लागते.

उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका विवाह सोहळ्यातून ही विचित्र घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका नवरदेवानं लग्नाची माळ वरीच्या गळ्यात घालण्याऐवजी मित्राच्या गळ्यात घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरेदवा मद्यधुंद अवस्थेत पाहून नवरीला राग आला, तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि लग्न रद्द केले. ही घटना घडल्यानंतर तिने लग्नाची मिरवणूकही परत पाठवली.वरमाला समारंभासाठी नवरा आणि नवरी मंचावर गेले. नवरीने नवरदेवाच्या गळ्यात पुष्पहार घातला. मात्र, मद्यधुंद अवस्थेत नवरदेवाने चुकून मित्राच्या गळ्यात हार घातली. लाजिरवाण्या परिस्थितीमुळे संतापलेल्या नवराने लग्नासाठी पुढे जाण्यास नकार दिला आणि मिरवणूक परत पाठवली.

पाहा व्हिडीओ

वधूच्या कुटुंबीयांनी तिला लग्नासाठी समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि लग्न करण्यास नकार दिला. “एकटी राहीन पण अशा व्यक्तीशी लग्न करणार नाही” असं तिनं स्पष्ट सांगितलं. नवरीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी नवरदेव आणि त्याच्या वडिलांची पोलिस चौकशी करत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.लिसांनी कारवाई करत नवरदेव आणि कुटुंबीयांना दंड ठोठावला. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Story img Loader