सापांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी एखादी व्यक्ती फसते तेव्हा काय होतं, हे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल. माणूस प्राण वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावतो. मात्र एखादा प्राणी जेव्हा विषारी सापांच्या विळख्यात सापडतो, तेव्हा काय होतं, याचा अनुभव एका व्हिडिओमधून आला आहे. या सापाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक कोब्रा साप आणि घोरपडीच्या फाइटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
साप आणि मुंगसाच्या लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण तुम्ही कधी साप आणि घोरपडीच्या लढाईचा व्हिडीओ पाहिलाय का? जर तुम्ही याआधी कधी असा नजारा पाहिला नसेल तर आता बघा. या व्हिडीओत तुम्हाला साप आणि घोरपडीची खतरनाक लढाई बघायला मिळेल. या लढाईत दोघांपैकी कोण जिंकतं, हे बघून तुम्हीही अवाक् व्हाल.
बघा कोण जिंकलं कुणाची झाली हवा टाईट
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका मैदानात एक नव्हे तर असंख्य साप आहेत. चारही बाजूने सापच साप दिसत आहे. या सापांनी घोरपडीला घेरलं आहे. यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी घोरपड या सापांसोबत दोन हात करते. चार पाच साप एकत्र येऊन घोरपडीला अखेर पकडतात, मात्र घोरपड जीव वाचवून त्यांच्या तावडीतून निसटते. अखेर या लढाईत घोरपड या सापांना मात देते. या एकट्या घोरपडीने असंख्य सापांना हरवत चलाखीनं स्वत:चा जीव वाचवला आहे. “फक्त स्वतःवरच विश्वास ठेवा, तुम्ही मृत्यूशीही लढू शकता…” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्या आलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: ‘प्रेमाची लागली भन्नाट’ आजोबांनी शेतातच धरला ठेका, पाहून आज्जीही झाल्या लाजून लाल
हा हैराण करणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. साप आणि घोरपड यांच्यातील थक्क करणाऱ्या दृष्यांचा हा व्हिडिओ जगभरात लाखोंच्या संख्येने शेअर करण्यात आला आहे.