Baya Bhukalyan Go Dance Video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड होत असतात. त्यात मराठमोळी गाणी तर भलतीच चर्चेत असतात. कोणतंही नवीन गाणं ट्रेंड झालं की जो तो त्यावर रील्स बनवू लागतो आणि व्हायरल होत असतो. ही गाणी असतातही तशीच मजेदार. गेल्या काही महिन्यांपासून, गुलाबी साडी, आप्पाचा विषय लई हार्ड हाय, नटीनं मारली मिठी अशी अनेक गाणी व्हायरल झाली आणि चर्चेत आली.

सध्या असंच एक जबरदस्त गाणं चर्चेचा विषय बनलं आहे. या गाण्यावर अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत, रीलस्टार्सपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच डान्स करताना दिसत आहेत. सध्या असाच डान्स दोन चिमुकल्यांनी केलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

चिमुकल्यांचा डान्स होतोय व्हायरल

सध्या ‘बाया भुकल्यान गो’ हे गाण सगळीकडेच ऐकू येतंय. या गाण्यावर रील करण्यासाठी व्हिडीओ बनवण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. सध्या असाच डान्स एका लहान मुलाने आणि मुलीने केलाय ज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आणि मुलगी ‘बाया भुकल्यान गो’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. हुबेहुब डान्स स्टेप करत त्यांनी नेटकऱ्यांचं मन जिंकून घेतलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून त्यांचं भरभरून कौतुकदेखील केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kaudi_gang या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

चिमुकल्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एकदम अप्रतिम डान्स झाला” तर दुसऱ्याने “खूपच छान” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मुलं तर खूप डान्स करतातच पण खरंतर एडिटिंग आणि शूटिंगही छान झाली.” तर नाद करायचा नाही, एक नंबर, लय भारी, जाम भारी अशा अनेक कमेंट्स युजर्सने या लहान मुलांसाठी केल्या आहेत.