Shocking video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी हसवणारे असतात कधी रडवणारे असतात तर काही व्हिडीओ हे आपले डोळे उघडणारेही असतात. तुम्हीही रस्त्यावर तुमची बाईक, स्कूटी पार्क करुन जाता का? मग हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल. आपल्या परिसरात मुद्दाम त्रास देणारे दुसऱ्याचं वाईट चिंतणारे अनेक जण असतात. अशाच अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर पार्क केलेल्या स्कूटीच्या सीटवर अशी गोष्ट ठेवली होती की जर लक्ष गेलं नसतं तर व्यक्तीला गंभीर जखम झाली असती. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.
तुम्हीही रस्त्यावर तुमची बाईक, स्कूटी पार्क करुन जाता का?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका अॅक्टिव्हा स्कूटरच्या सीटवर अज्ञातांनी टोकदार पीन लावली आहे. ही पीन अशा पद्धतीने लावली आहे की एखादा आला आणि गाडीवर बसला की ती पीन त्याला टोचणार आणि तो जखमी होणार. विनाकारण त्रास देण्यासाठी हा प्रकार केल्याचं दिसत आहे. नशीब या व्यक्तीचं सीटकडे लक्ष गेलं अन्यथा सीटवर बसल्यानंतर व्यक्तीला दुखापत झाली असती. स्थानिक मुलांनीच हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी राहणा-या नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये व्यक्तीने गाडीवर बसण्याआधी सीट एकदा व्यवस्थित तपासण्याचे आवाहन केले आहे.
गाडी नो पार्किंगमध्ये लागली, की ती ‘टो’ होण्याची भीती असतेच. पण आपल्याकडे अनेकजण या भीतीच्या पलिकडे गेले आहेत. वारंवार सांगूनही बेशिस्तपणे गाड्या पार्क करण्याचे प्रताप आपल्या आजूबाजूला होताना सहज दिसतील. यावेळी काहीजण नो पार्किंग मधल्या गाड्याच्या टायरमधली हवा काढतात कोणी गाडी तिथून हटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र सध्या समोर आलेला प्रकार फार गंभीर आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला आता है; १५ सेंकदात दाखवून दिलं स्वत:चं अस्तित्व; VIDEO पाहून झोप उडेल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ iammharshvlogs नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं कमेंट केलीय, “हे असं करुन काय मिळतं? जगा आणि जगुद्या” तर अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.