Viral Video: अस्वल सामान्यतः शांतताप्रिय प्राणी असतात, परंतु कधी त्याला राग येईल हे सांगता येणं कठीण आहे. अस्वलाने हिंस्त्र रुप घेतलं तर मग काही खरं नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही अस्वलाला पाहू शकता. समजा तुम्ही जंगलातून प्रवास करत असला आणि तुमच्यावर अस्वलाने हल्ला केला तर? अशा वेळी तुमची एक चुक देखील तुमच्या जीवावर बेतू शकते. यासंबंधीत एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अस्वल स्पीड बोटीचा पाठलाग करताना दिसत आहे. या थरारक आणि भयावह घटनेने केवळ पर्यटकांनाच घाबरवले नाही, तर इंटरनेटवरील लोकांचीही झोप उडवली आहे. व्हिडीओमध्ये एक मोठे अस्वल पाण्याच्या काठावरून धावत स्पीड बोटीचा पाठलाग करतेय हे स्पष्टपणे दिसून येते; तर बोटीतील पर्यटक त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बोटीच्या मागे अस्वल
व्हिडीओच्या सुरुवातीला काही पर्यटक स्पीड बोटीवरून नदीकाठावर फिरण्याचा आनंद घेत आहेत. अचानक एक अस्वल किनाऱ्यावर येते आणि बोट पाहताच त्याचा पाठलाग करू लागते. अस्वलाचा वेग इतका वेगवान आहे की, तो पाण्यात उतरूनही बोटीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. बोटीतील लोक भीतीने ओरडत आहेत आणि एक मुलगा त्याच्या फोनवर संपूर्ण घटना रेकॉर्ड करीत आहे. त्याच्या शेजारी बसलेली महिलाही तिच्या फोनवरून हे भयानक दृश्य रेकॉर्ड करीत आहे.
पर्यटकांच्या जीविताला धोका
ही घटना जंगलाजवळील एका नदीत घडल्याचे सांगितले जाते, जिथे अस्वलांसारख्या वन्य प्राण्यांची उपस्थिती सामान्य आहे. पण, अस्वल अशा प्रकारे स्पीड बोटीचा पाठलाग करत आहे आणि पाण्यात उतरून त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत आहे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. बोटीचा वेग जास्त असल्याने पर्यटक भाग्यवान होते की, ते अस्वलापासून वाचले. जर बोटीचा वेग कमी असता, तर हा रोमांचक प्रवास एका भयानक अपघातात बदलू शकला असता.
येथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ X या सोशल साइटवर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, तो एक कोटी २० लाख लोकांनी पाहिला आहे आणि ४२ हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. हे पाहिल्यानंतर लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक पर्यटकांच्या धाडसाचे कौतुक करीत आहेत. तर, काहींना आश्चर्य वाटतेय की, अस्वल इतक्या वेगाने बोटीचा पाठलाग कसा करू शकते. अनेक वापरकर्त्यांनी याला “निसर्ग साहस” म्हटलेय. तर, काहींनी याला “धडा” म्हटलेय. काहींनी, “वन्य प्राण्यांना हलक्यात घेऊ नये”, असेही म्हटलेय.